पुणे

खंडाळा - खेड केंद्राचा बालआनंद मेळावा उत्साहात .

CD

खेड केंद्राचा बालआनंद मेळावा उत्साहात

खंडाळा, ता. ११ : तालुक्यातील खेड केंद्राचा बालआनंद मेळावा केंद्रशाळा खेड बुद्रुक येथे उत्साहात झाला. मेळाव्यात कलादालन व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन हे मुख्य आकर्षण ठरले.
या बालआनंद मेळाव्याचे उद्‍घाटन जिल्हा परिषद सदस्य ऋषिकेश धायगुडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या वंदना धायगुडे, खेड बुद्रुकचे माजी सरपंच गणेश धायगुडे, सरपंच उमा रासकर, सोसायटीचे अध्यक्ष किसन धायगुडे, विस्ताराधिकारी हणमंत धायगुडे, केंद्रप्रमुख रवींद्र ठोंबरे, केंद्रातील सर्व शाळा समितीचे अध्यक्ष व मुख्याध्यापक, दत्तात्रय धायगुडे, गौरी धायगुडे व शिक्षक उपस्थित होते.
या वेळी मान्यवरांच्या हस्ते कलादालन, कार्यानुभव दालन, रांगोळी दालनाचे उद्‍घाटन करण्यात आले. ऋषिकेश धायगुडे, वंदना धायगुडे व गणेश धायगुडे यांनी मार्गदर्शन केले.
मेळाव्यात प्रथम सत्रात ‘चेहरा रंगवणे’ यांसारखे फनी गेम्स् घेण्यात आले. दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
या वेळी केंद्रातील सर्व १८ शाळांनी गीत सादर केले. प्रत्येक शाळेने मुलांना गीताप्रमाणे ड्रेस कोड घालून अप्रतिम नृताविष्कार सादर केला. मुलांनी सामूहिक भोजनाचा आनंद घेतला. संजय धायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका यास्मीन पठाण यांनी आभार मानले.

----------------------------

कोट

सध्या आनंद मेळाव्यासाठी मिळणारे शासकीय अनुदान अतिशय तोकडे असून, यात मंडपाचा खर्चही भागत नाही. यापुढे ५० हजार अनुदान मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे.

- ऋषिकेश धायगुडे, जिल्हा परिषद सदस्य, खेड बुद्रुक.
---------------------------------
06051
खेड : कला दालनाचे उद्‍घाटन करताना वंदना धायगुडे, त्या वेळी ऋषिकेश धायगुडे, संजय धायगुडे आदी.

-------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT