पुणे

जनाई योजनेच्या आवर्तनास सुरुवात

CD

खुटबाव, ता. १४ : खोर (ता. दौंड) जनाई उपसा योजनेच्या वितरिका टप्पा क्रमांक ३मधून येथील फरतडे वस्ती तलावात मंगळवारी (ता. १२) सकाळपासून उन्हाळी आवर्तनाचे पाणी सोडण्यात सुरुवात केली आहे. या पाण्यामुळे सुमारे एक हजार एकर अंजीर शेतीला दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे परिसरातील विहिरी, कुपनलिका, शेततळे आणि इतर पाणीस्रोतांची पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे संकट उभे राहिले होते. या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जनाई उपसा योजनेतून आवर्तन सुरू केले आहे.
परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी अंजीर बागांची छाटणी सुरू केली असून, या काळात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. वेळेवर पाणी उपलब्ध झाल्यास अंजीर हंगामाला मोठा फायदा होणार आहे. तसेच, जनावरांसाठी चारा मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून आवर्तन घेतले असून, १९ टक्के हिस्सा शेतकऱ्यांनी, तर ८१ टक्के हिस्सा शासनाने वीज बिलाच्या स्वरूपात उचलून ही योजना कार्यान्वित केली आहे. दरम्यान, पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावात देखील तत्काळ आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पाण्याचे सर्व स्रोत आटले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्रितपणे आवर्तनाची मागणी केली. मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात आले असून, हे आवर्तन किमान सात दिवस सुरू ठेवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
- जालिंदर डोंबे, शेतकरी

03549

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT