Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News : बालकाला पळवून तीन लाखांत विकलेल्या टोळीचा छडा

पुणे रेल्वे स्थानकावरून सहा महिन्यांच्या बालकाला पळवून त्याची तीन लाख रुपयांना विक्री केलेल्या कर्नाटकातील टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करून पोलिसांनी बालकाची सुखरूप सुटका केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून सहा महिन्यांच्या बालकाला पळवून त्याची तीन लाख रुपयांना विक्री केलेल्या कर्नाटकातील टोळीचा बंडगार्डन पोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करून पोलिसांनी बालकाची सुखरूप सुटका केली. तीन लाख रुपयांना बालक विकत घेतलेल्या व्यक्तीलाही अटक करण्यात पोलिसांनी यश मिळविले.

चंद्रशेखर मलकाप्पा नडुगंडी (वय २४, रा. जंबगी, जि. विजापूर, कर्नाटक) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याने चार साथीदारांसह सुभाष पुतप्पा कांबळे (वय ५५, रा. लवंगी, जि. सोलापूर) याला बालकाची विक्री केल्याचे उघड झाले.

यवतमाळ येथील तेलंग दांपत्याच्या बालकाला पळवून नेण्यात आले होते. नातेवाइकांना भेटण्यासाठी पुण्यात आलेले हे दांपत्याच्या बालकासह पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात झोपले होते. त्यावेळी आरोपींनी पहाटे दोनच्या सुमारास आईजवळील बालकाला उचलून नेले होते.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक आयुक्त संजय सुर्वे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी तपास पथकाला सूचना दिल्या.

त्यानुसार पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील ५० हून जास्त सीसीटीव्हीमधील चित्रीकरण तपासले. त्यात संशयित आरोपी कोणत्या मार्गाने गेले हे दिसून येत नव्हते. आरोपी मोटारीतून गेले असावे, असा संशय बळावल्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. त्यातून कर्नाटकातील विजापूरला गेल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार पोलिसांनी नडुगंडीला विजापूरमधून ताब्यात घेतले. त्याने चार साथीदारांच्या मदतीने बालकाची कांबळेला विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर विजापूरमधील एका हॉटेलमधून कांबळेला अटक करण्यात आली. नडगुंडीचे साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या भरधाव कारची डंपरला धडक, मुंबईतल्या एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू; गाडीचा चुराडा

Petroleum Ministry Update: पेट्रोल पंपावरील UPI पेमेंटवर 5 रुपयांचे शुल्क लागणार की नाही? पेट्रोलियम मंत्रालयाचं स्पष्टीकरण

VIDEO: ६४५ रुपयांना फोडणीचा भात, मुंबईतील ५ स्टार हॉटेलचा मेनू Viral

Maharashtra Ganesh Visarjan Live: कर्जाच्या डोंगरामुळे तरुण शेतकऱ्याने दिला जीव

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

SCROLL FOR NEXT