पुणे

कुरकुरीत चकल्यांना मोटारीचा आकार

सकाळवृत्तसेवा

पुणे - शार्दूलने गोल चकली करण्याऐवजी तिला कारचा आकार दिला. शर्वरी आणि अमृताने मोबाईल, माणूस असे भन्नाट आकार दिले. ते करताना त्यांना हसू आवरत नव्हतं. 

शर्वरीने यंदा दिवाळी फराळ तयार करणाऱ्या आईला सांगितलं, ‘‘आई गं, मला अन्‌ माझी मैत्रीण अमृताला लाडू, चकल्या करायला शिकव ना!’’ आईने (प्रज्ञा देवधर) हो म्हणताच शर्वरीचा धाकटा भाऊ शार्दूलही त्यात सहभागी झाला. कारची खेळण्यातली मॉडेल्स जमवायची त्याला आवड आहे. म्हणून त्याने कार तयार केली. या आधी शार्दूलच्या आईने चकलीसाठी भाजणीचं पीठ भिजवणं, ते सोऱ्यात भरणं, गोलाकार चकल्या तयार करणं वगैरे प्रक्रिया या तिघांना दाखवली. 

शर्वरी आणि अमृताला लाडू करायला शिकायचं म्हणून शर्वरीच्या आईने दोघींना रवा निवडायला दिला. त्यात कचरा नाही ना, हे पाहून रवा भाजायला शिकवलं. शर्वरीने प्रश्न विचारला, की रवा भाजला गेला हे कसं ओळखायचं? आईकडून पुढे काय काय करायचं हे सर्व प्रशिक्षण मिळालं. आपण छान लाडू केले, ही बातमी मग शर्वरीने आनंदानं वरच्या मजल्यांवर आणि शेजारच्या घरांमध्ये दिली. या मुलांनी मिळून तयार केलेल्या गमतीदार चकल्या आणि मस्त लाडू खाऊन आजी- आजोबा, आत्या वगैरे सगळ्यांनी खूप कौतुक केलं. या पाककृती शर्वरीने शाळा सुरू झाल्यावर मैत्रिणींना सांगण्यासाठी वहीत लिहून तर ठेवल्याच आहेत. शिवाय, त्या करतानाचे फोटो आणि व्हिडिओही बाबांना घ्यायला लावले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT