kirit somaiya esakal
पुणे

किरिट सोमय्या प्रकरण: सुरक्षा विभागाच्या उपायुक्तांना खुलासा करण्याचे आदेश

शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले

सकाळ वृत्तसेवा

पुणे:भाजप नेते किरिट सोमय्या यांना धक्काबुक्की झाल्याचे प्रकरण चांगलेच तापलेले असताना आता पुणे महापालिकेच्या सुरक्षा विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांना खुलासा करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

किरिट सोमय्या हे शनिवारी (ता.५) महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आले असता शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले. अचानक सुरू झालेल्या या गोंधळामध्ये सोमय्या यांना धक्काबुक्की झाली, त्यामुळे ते पायऱ्यांवरून खाली पडले, तसेच त्यांच्या गाडीवर जोरजोरात बुक्क्या मारल्याने सोमय्या यांना काढता पाय घ्यावा लागला. याप्रकरणाचे राजकीय पडसाद उमटले असून, केंद्र सरकारकडेही याची तक्रार केली आहे. तर महापौरांनी देखील आयुक्तांना या प्रकरणाचा लेखी खुलासा करण्याची सूचना केली आहे.

हा गोंधळ झाल्याने पुणे महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी महापालिका बंद असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आतमध्ये घुसले कसे हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. त्यामुळे त्यामुळे अतिरिक्त आयुक्तांनी उपायुक्त माधव जगताप यांना खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. माधव जगताप यांच्याकडून खुलासा आल्यानंतर सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले.

पोलिसांसोबत बैठक

सोमय्या यांचे प्रकरण झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांची व महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. महापालिकेत पुढील काही दिवस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. तसेच महापालिकेने सीसीटीव्हीचे फुटेज प्रमाणित करून पोलिसांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चा

SCROLL FOR NEXT