Court sakal
पुणे

किरीट सोमय्या धक्काबुक्की प्रकरण : शिवसेना शहरप्रमुखासह १० जणांना अटक आणि सुटका

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका परिसरात धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. ८) १० जणांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुणे महापालिका परिसरात धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. ८) १० जणांना अटक केली.

पुणे - भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुणे महापालिका (Pune Municipal) परिसरात धक्काबुक्की (Pushback) केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी (Police) मंगळवारी (ता. ८) १० जणांना अटक (Arrested) केली. त्यानंतर त्यांना पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्तात न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एस. व्ही. दिंडोकर यांनी त्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन (Bail) मंजूर केला आहे.

शिवसेनेचे शहरप्रमुख संजय हरिश्चंद्र मोरे, युवासेनेचे सहसचिव किरण प्रकाश साळी, सूरज नथुराम लोखंडे, आकाश चंद्रकांत शिंदे , रूपेश आनंदराव पवार, राजेंद्र दामोदर शिंदे, नीलेश दशरथ गिरमे, मुकुंद पांडुरंग चव्हाण, अक्षय शरद फुलसुंदर आणि नीलेश हनुमंत जगताप असे जामीन मिळालेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्यासह एकूण ६० ते ७० महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लाटे (वय ३०, रा. वडारवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर शनिवारी (ता. ५) रोजी सायंकाळी पावणेपाच वाजता हा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात सोमवारी सनी वसंत गवते याला अटक करण्यात आली होती.

जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायऱ्यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते बेकायदेशीर जमाव जमवून तेथे आले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसऱ्या पायरीवरून ओढले. त्यामुळे सोमय्या पडले व त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागला.

न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी ॲड. सतीश मुळीक आणि ॲड. सचिन हिंगणेकर यांनी अर्ज केला. या अर्जास सरकारी वकिलाने विरोध करीत गुन्ह्यात आणखी आरोपींचा सहभाग असून त्यांना अटक करायची आहे. तसेच मुख्य सुत्रधाराबाबत तपास बाकी आहे. हा गुन्हा राजकीय स्वरूपाचा असून त्या अनुषंगाने तपास करायचा असल्याने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

England Squad vs Pakistan : पाकड्यांचा बँड वाजवण्यासाठी इंग्लंडने जाहीर केला तगडा संघ! २ वर्षानंतर एका खास ऑल राऊंडरला बोलावले... बाबरच्या संघाचे धाबे दणाणले

Abhijit Dipke: जंतरमंतर आंदोलनकर्त्यांना डावलल्याचा आरोप; मनीष ब्रह्मभट यांचा अभिजीत दीपके यांच्या घरासमोर ठिय्या

Marathi News Live Updates : पुण्यात सराईत गुन्हेगारांकडून धारदार १२ लोखंडी शस्त्रे जप्त

Nanded Guru Gobind Singh MoU: गुरु गोबिंदसिंघजींच्या विचारांच्या जागतिक प्रसारासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा व देशभक्त विद्यापीठांचा सामंजस्य करार

Thane Crime: नामांकित बांधकाम व्यावसायिकाला यंत्रणांचा धाक दाखवून ८ कोटींची मागणी, खंडणीप्रकरणी तिघांना अटक

SCROLL FOR NEXT