kirit somaiya esakal
पुणे

पुणे : किरिट सोमय्या शुक्रवारी भेटणार आयुक्तांना

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की झाल्याने तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.

सकाळ वृत्तसेवा

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की झाल्याने तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.

पुणे - भाजपचे (BJP) माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना महापालिकेत (Municipal) धक्काबुक्की झाल्याने तेथून काढता पाय घ्यावा लागला होता. आता सोमय्या हे शुक्रवारी (ता. ११) महापालिकेत आयुक्तांना (Municipal Commissioner) भेटायला (Meet) येणार आहेत,अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

दरम्यान, सोमय्या यांना महापालिकेत धक्काबुक्की झाली तेव्हा, त्यांच्यासोबत भाजपचे संघटनेतील व महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित नसल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित केले जात असताना आता मात्र, शुक्रवारी जेथे सोमय्या यांना धक्काबुक्की झाली, तेथेच त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची घोषणा भाजपने केली आहे.

दरम्यान, आज (ता. ८) भाजपने सोमय्या यांच्यावर दोन दिवसांपूर्वी महापालिकेत हल्ला झाल्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून शिवसैनिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, सरचिटणीस गणेश घोष, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, अजय खेडेकर, राजेश येनपुरे, दीपक पोटे, धीरज घाटे, सुशील मेंगडे, बाप्पू मानकर, संदीप खर्डेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते.

मुळीक म्हणाले, ‘‘ सोमय्या यांच्यावर शिवसेनेच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे आवश्यक होते. पण महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली सौम्य कारवाई केली आहे. घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत, त्यामध्ये प्राणघातक हल्ला करण्याचा उद्देश स्पष्ट होतो. आम्ही महाविकास आघाडीचा निषेध करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Satara MLC Result : सांगली-साताऱ्यात जयंत पाटलांना मोठा धक्का! भाजपच्या धैर्यशील कदमांनी शरद पवार गटाचा गेम उलटवला; पाहा किती मतांनी केला पराभव

Maharashtra Legislative Council Results : महायुतीचा विधानपरिषदेत दणदणीत विजय; ११ पैकी १० जागा खिशात, नाशिकमध्ये अपक्ष गितेंनी दिला धक्का

Gold-Silver Price Today : सोने-चांदीच्या दरात एकाच दिवशी प्रचंड उसळी; चांदी तब्बल 4,000 ने महागली, सोन्याचा काय भाव? पाहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Yashasvi Jaiswal: तंबूत राहणाऱ्या मुलाने वडिलांना दिली 1.32 कोटींची कार; यशस्वी जैस्वालची ही भेट पाहून तुम्हीही भावूक व्हाल!

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापार करारावर आज दिल्लीत चर्चा

SCROLL FOR NEXT