पुणे

संवर्धन प्रकल्प प्रकाशन

CD

‘किरकसाल’ ठरेल संवर्धन प्रकल्पाचे मॉडेल

सुनील लिमये; अहवालाचे प्रकाशन, वन्यजीवरक्षकांचा सन्मान


सकाळ वृत्तसेवा
......................

गोंदवले, ता. २६ : किर्रर्र झाडी, घनदाट वन आणि माणदेशातील अद्वितीय माळरान परिसंस्था पुन्हा जिवंत करण्याची क्षमता किरकसाल संवर्धन प्रकल्पात आहे. त्यामुळे हा प्रकल्प संवर्धनाचे यशस्वी मॉडेल बनेल, असा विश्वास राज्याचे निवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी व्यक्त केला.
आदर्श गाव किरकसाल (ता. माण) येथील परिसरातील माळरान ही जैवविविधतेसाठी ओळखली जाणारी महत्त्वाची परिसंस्था आहे. गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण, पाण्याची कमतरता व हवामान बदलामुळे या परिसराचे स्वरूप बदलू लागले. या पार्श्वभूमीवर तयार केलेला किरकसाल संवर्धन प्रकल्प हा वैज्ञानिक पद्धतीने माळरान व वनसंवर्धन साध्य करण्याचा उपक्रम आहे. या प्रकल्पाच्या अहवालाचे प्रकाशन, तसेच वन्यजीवरक्षक सन्मान कार्यक्रम श्रीनाथ मंदिरात झाला. त्यावेळी ते बाेलत हाेते.
माणदेशातील माळरान परिसंस्थेच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या किरकसाल संवर्धन प्रकल्पाच्या अहवाल प्रकाशनासाठी साताऱ्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, दहिवडीचे वनक्षेत्रपाल अमित मुळीक, वडूजचे वनक्षेत्रपाल नितीन आटपाडकर, माणदेशी फाउंडेशनचे करण सिन्हा, प्रा. प्रमोद लावंड, प्रा. थिगळे, प्रा. डॉ. सुहन मोहोळकर, प्रा. हनुमंत कायंदे, प्रा. संजय जगदाळे, सूरज दिवटे, वन्यजीव अभ्यासक पूजा प्रसाद बोलदे, अर्णव गंधे, पक्षी अभ्यासक डॉ. प्रवीण चव्हाण, अजित काटकर, सरपंच शोभा कुंभार, सतीश मोरे, प्रकाश सावंत, हर्षदा सावंत, अनुष्का सावंत आदी उपस्थित होते.
श्री. लिमये म्हणाले, ‘‘वनसंवर्धन म्हणजे फक्त झाडे लावणे नव्हे, तर ती जगवणे, जैवविविधता वाढवणे आणि ग्रामस्थांना या प्रक्रियेचा केंद्रबिंदू बनवणे आवश्यक असते. जंगल नष्ट होण्यापासून वाचवल्यास जैवविविधतेचे संवर्धन होण्यात मदत होईल. किरकसालकरांच्या लोकसहभागामुळे यशस्वी संवर्धनाचे मॉडेल तयार होऊ शकते.’’
श्री. सातपुते म्हणाले, ‘‘किरकसाल परिसरात जैवविविधतेचे यशस्वी काम गेल्या काही वर्षांपासून सुरू असल्याचा आनंद आहे. हे माळरान संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित व्हावे, यासाठी वन विभागाकडून सहकार्य केले जाईल. माळरान संवर्धन हे खूपच दुर्मिळ होत चालले आहे. त्याचाच परिणाम म्हणून, लांडगा, कोल्ह्याचे प्रमाण कमी होत आहे. हे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी वन, पक्षी, वनस्पती अभ्यासक, तसेच ग्रामस्थांच्या सहकार्यातून वन विभागाकडून प्रयत्न केले जातील.
करण सिन्हा म्हणाले, ‘‘लांडगा टिकवून ठेवला तरच, जैवविविधता वाढीस लागेल. अन्यथा आपल्याही परिसरात बिबट्याचा वावर वाढून लोकांना जगणे कठीण होईल.’’
जैवविविधतेच्या संवर्धन कामात योगदान देणाऱ्यांना वन्यजीवरक्षक म्हणून सन्मानित केले. यासाठी वन्यप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते. किरकसाल संवर्धन प्रकल्प प्रमुख चिन्मय सावंत यांनी प्रास्ताविक केले. अमोल काटकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्णव गंधे यांनी आभार मानले.

-------------

चाैकट
-------------------
ग्रामस्थांचा निर्धार...

आदर्शगाव किरकसालकरांच्या उस्फूर्त पुढाकाराने केलेल्या माणदेशातील माळरान पुनरुज्जीवनाचा मागोवा संपूर्ण राज्याला घेता येईल. वन विभाग, तज्ज्ञ आणि ग्रामस्थ यांचे त्रिसूत्री सहकार्य असल्याने किरकसाल लवकरच माणदेशातील एक आदर्श संवर्धन प्रकल्प ठरेल. यासाठी पुढील वाटचाल सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी या वेळी केला.


--------
B02574
किरकसाल (ता. माण) : किरकसाल संवर्धन प्रकल्पच्या अहवालाचे प्रकाशन करताना सुनील लिमये, अमोल सातपुते, मान्यवर. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)

---------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ichalkaranji Violence Ambedkar Jayanti : इचलकरंजीत आंबडेकर जयंतीला दगडफेक, पोलिस कॉन्स्टेबल जखमी; जाणीवपूर्वक हल्ल्याचा संशय

Latest Marathi News Live Update: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

Latur News: मरणानंतरही संपेनात ‘मरणयातना’; निलंगा तालुक्यात स्मशानभूमीचा प्रश्न गंभीर, अनेक गावांमध्ये गैरसोय

Organ Donation Story: सासूने दिले जावयाला जीवनदान; रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, किडनी दानातून उभा केला संसाराचा आधार!

Swami Samarth Punyatithi 2026: स्वामींच्या 'या' शेवटच्या शब्दांचा आजही लाखो भक्तांना आधार; संकटांवर मात करण्याचा मिळतो आत्मविश्वास

SCROLL FOR NEXT