पुणे

मूलभूत प्रश्नांसाठी किसान सभेतर्फे उपोषणाचा इशारा ----------------

CD

मूलभूत प्रश्नांसाठी किसान
सभेतर्फे उपोषणाचा इशारा
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील पाणी, रस्ते, वीज आणि पुनर्वसनाच्या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी (ता. २२) घोडेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
अखिल भारतीय किसान सभा, आंबेगाव तालुका समितीच्या वतीने यापूर्वी ७ एप्रिल रोजी पंचायत समिती, घोडेगाव कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने किसान सभेने निवेदनाद्वारे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. निवेदन देताना किसान सभेचे पुणे जिल्हा सचिव अशोक पेकारी, जिल्हा सहसचिव राजू घोडे, जिल्हा खजिनदार तथा आंबेगाव तालुका सचिव कमल बांबळे, अविनाश गवारी, समीर गारे, रोहन बांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये आदिवासी भागातील जलजीवन पाइपलाइन योजना तातडीने पूर्ण करणे, पोखरी प्रादेशिक पाणी योजना नियमित सुरू करणे, वाडी-वस्त्यांवरील अपूर्ण रस्त्यांची कामे पूर्ण करणे, खराब वीज पोल आणि वीजवाहिन्यांची दुरुस्ती करणे, वाढीव वीजबिलांचा प्रश्न मार्गी लावणे, धोकाग्रस्त गावांचे पुनर्वसन करणे तसेच पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये तत्काळ टँकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालवाहू जहाजांना फटका! 'जेएनपीए'त अडकले एक लाखाहून अधिक कंटेनर

Buldhana News: जिल्ह्यात २० गावांमध्ये रिचार्ज शाफ्ट कामांना मंजुरी; पाणीटंचाई निवारणः १२७ उपाययोजनांना मिळाली प्रशासकीय मान्यता

Latest Marathi News Live Update : येवल्यात कांद्याचे दर कोसळले, शेतकरी संतप्त

Mumbai News: धारावीकरांसाठी दिलासादायक बातमी! कागदपत्र पडताळणी आता जागेवरच; प्रशासन अॅक्शन मोडमध्ये

राज्यात ७५०० पैकी २००० पंप बंद, तरी मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात,'पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका'

SCROLL FOR NEXT