पुणे

वाई:-ग्रामकन्यांची मुंबई पोलीस दलात भरारी.''किसन वीर'' मध्ये यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव

CD

‘किसन वीर’च्या आठ विद्यार्थिनी पोलिस दलात


वाई, ता. १५ : येथील किसन वीर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आठ विद्यार्थिनींची मुंबई शहर पोलिस दलात निवड झाली. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला.
नुकत्याच झालेल्या मुंबई शहर पोलिस भरती प्रक्रियेत रेश्मा चव्हाण (बावधन), सुहाना शेख (चांदवडी), अमृता शिर्के (धोम पुनर्वसन), नेहा सपकाळ (केंजळ), नूतन वरखडे (वरखडवाडी), सानिका तरडे (सुलतानपूर), लक्ष्मी सिन्नूर (सुलतानपूर) आणि प्रतीक्षा राजपुरे (कनूर) या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. त्यांच्यासह शारीरिक प्रशिक्षक निवृत्त सुभेदार विशाल महांगडे यांचा सत्कार झाला. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले. डॉ. विनोद वीर यांनी केंद्राची उभारणी, त्याचे कार्य, तसेच कौशल्य विकास केंद्र आणि विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विशाल महांगडे, प्रा. राजेंद्र जायकर, तानाजी हाके, उमेश आडुळकर, तसेच विक्रम जाधव यांचे आभार मानले. कार्यक्रमास यशस्वी विद्यार्थिनींचे पालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी, तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. राजेंद्र जायकर यांनी आभार मानले.

---------

08109
वाई : मुंबई पोलिस दलात निवड झालेल्या विद्यार्थिनींच्या गौरव प्रसंगी मदन भोसले, आदी.
...............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kudankulam Data Leak: देशाच्या अणुसुरक्षेला मोठा धोका? भारताच्या सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाचा डेटा लीक; कुडनकुलम प्रकरण नेमकं काय आहे?

IPL 2027: नवा कॅप्टन ते हार्दिक पांड्याचे ट्रेड... Mumbai Indians ची मोठे निर्णय घेण्यासाठी इंग्लंडमध्ये मिटिंग

Fine Arts BFA Admission: कला शिक्षणाच्या प्रवेश नोंदणीस रविवारपर्यंत मुदतवाढ; अभ्यासक्रमासाठी १ हजार ३७९ विद्यार्थ्यांची नोंदणी

‘कॅन वी अटेंड युअर वेडिंग?’ म्हणत भूषण प्रधान- सायली पाटील पोहोचले चाहत्यांच्या लग्नात; व्हिडिओ व्हायरल!

Bullet Train: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवासाचा खर्च किती होणार? तिकीट दर विमानांपेक्षा किती स्वस्त असणार, जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT