पुणे

कृषी सल्ला (कोकण विभाग)

CD

कृषी सल्ला (कोकण विभाग)

नागली / नाचणी
- काढणी
- पक्व नागली पिकाची कणसे विळ्याने कापावीत. कापलेली कणसे शेतात न ठेवता सुरक्षित आणि कोरड्या ठिकाणी वाळवावीत. कणसे पूर्णपणे वाळल्यानंतर मळणी करावी. मळणी केलेले धान्य २ ते ३ दिवस उन्हात चांगले वाळवून स्वच्छ, कोरड्या आणि हवेशीर ठिकाणी साठवावे.

कुळीथ
- पूर्वमाशागत व पेरणी
- कमी पाऊस व तापमानातील वाढीमुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. भात पिकाची काढणी पूर्ण झालेल्या ठिकाणी जमिनीत पुरेसा अंगओलावा उपलब्ध असल्यास त्वरित कुळीथ पिकाची पेरणी करावी. सुरुवातीच्या पिकाच्या वाढीच्या काळात सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास गरजेनुसार पाणी द्यावे. पिकाची उगवण झाल्यानंतर साधारणतः १०–१५ दिवसांनी भाताच्या पेंढ्याचे किंवा इतर नैसर्गिक पदार्थांचे आच्छादन करावे. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल.

कुळथाची शून्य मशागत पेरणी-
पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या क्षेत्रात जमिनीतील अंगओलावा टिकवून ठेवण्यासाठी, मशागतीचा खर्च व वेळ कमी करण्यासाठी कुळीथ पिकाची विनामशागत पेरणी करावी. यासाठी खरीप भात काढणीनंतर ताबडतोब शेतातील तणांच्या नियंत्रणासाठी शिफारशीत अनिवडक तणनाशकाची फवारणी करावी. त्यानंतर कोणतीही मशागत न करता टोकण पद्धतीने ३० × १५ सें.मी. अंतरावर कुळीथ पिकाची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी बियाण्याशेजारी बियाण्यांशी थेट संपर्क होणार नाही अशा पद्धतीने छिद्र पाडून मिश्रखत द्यावे. प्रति गुंठा १ किलो दाणेदार मिश्रखत पुरेसे होईल.

बागायती कुळीथ लागवड -
सिंचनाची पुरेशी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी जमिनीची उभी-आडवी नांगरट करून ढेकळे फोडून घ्यावीत. नांगरणीच्या वेळेस प्रती गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्टखत मिसळून जमीन समपातळीत आणावी. कुळीथाची पेरणी ओळीत ३० सें.मी. अंतर ठेवून करावी. पेरणीपूर्वी एक कि.ग्रॅ. बियाण्यास २.५ ग्रॅम प्रमाणे थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीपूर्वी रायझोबिअम २५ ग्रॅम प्रमाणात प्रक्रिया करून लगेच पेरणी करावी. पिकाला पेरणीच्या वेळेस ५४० ग्रॅम युरिया आणि ३ कि.ग्रॅ. सिंगल सुपर फॉस्फेट आणि १ कि.ग्रॅ. म्युरेट ऑफ पोटॅश प्रति गुंठा मात्रा ओळीत मातीमध्ये चांगली मिसळून द्यावीत.

कमीत कमी मशागतीवर कुळीथ पेरणी -
पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या क्षेत्रात जमिनीतील अंगओलावा टिकवून ठेवण्यासाठी, मशागतीचा खर्च व वेळ कमी करण्यासाठी कमीत कमी मशागतीवरही कुळीथ पेरणी करता येते. त्यासाठी भात काढणी पूर्ण झालेल्या व जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध असलेल्या ठिकाणी मशागत करताना प्रति गुंठा ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. कुळथाची पेरणी ओळीत ३० सें.मी. अंतरावर करावी. बागायती प्रमाणे बीजप्रक्रिया व खत व्यवस्थापन करावे.
पेरणीनंतर ८ ते १२ दिवसांनी आवश्यकतेनुसार कुळीथ पिकात विरळणी करावी.

डॉ. यशपाल चव्हाण, ८१४९४६७४०१
ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांचा अपमान, मृतदेह डंपरमधून नेल्याने संताप; भाजप आमदारांचा जम्मू-काश्मीर पोलिसांवर हल्लाबोल

वडिलांच्याच बँकेच्या ATM मधून संकर्षणने चोरले पैसे; आठवण सांगताना म्हणाला...'आजोबामुळे वाचलो'

Marathi Language : आमची मराठी नेमकी कोणती? मिलेनियल आणि जेन झी पिढीच्या भाषेचा बदलता चेहरा

Latest Marathi News Live Update : उजनी धरणावरील कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती केंद्राला विरोध तीव्र, प्रकल्प रद्द करण्यासाठी २७ नोव्हेंबरला मशाल मोर्चा

Ramlila Maidan : रामलीला मैदानावर आता ५० हजारांपेक्षा अधिक आंदोलकांना प्रवेश नाही? दिल्ली पोलिसांची नवी नियमावली प्रस्तावित

SCROLL FOR NEXT