PMT Bus
PMT Bus Sakal
पुणे

‘पुंडलिक वर दे’चा जयघोष; कोंढवे-धावडे ते आळंदी बससेवेचा मुहूर्त

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : झेंडूच्या फुलच्या माळांनी संपूर्ण बस सजविलेली… टाळ व मृदुंग गजर ‘पुंडलिक वर दे’ चा जयघोष करीत, ‘पीएमपीएमएल’च्या बस मार्ग क्रमांक ८३ एनडीए गेट (कोंढवे- धावडे) ते आळंदी बससेवा आज सुरु करण्यात आली. ह.भ.प. मधुकर ठाकरे महाराज व ‘पीएमपीएमएल’चे संचालक व नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते करण्यात आली. माजी उपसरपंच स्नेहल अमोल धावडे व उद्योजक अमोलशेठ धावडे यांच्या पाठपुराव्यामुळे बससेवा सुरु झाली.

यावेळी, ‘पीएमपीएमएल’चे अधिकारी दत्तात्रेय झेंडे, चंद्रकांत वरपे, चालक दीपक लोंढे, वाहक विजय खाडे, गणेश गावंडे यांचा फेटा बांधून सत्कार केला. अंजनी कार्यालयात झालेल्या कार्यक्रम जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिला व ग्रामस्थ भजनी मंडळाने वारकरी संप्रदायाची भजनाची पंचपदीने सुरवात केले. गावातील 20 वारकऱ्यांनी आळंदी पर्यंत प्रवास केला.

नगरसेविका सायली वांजळे- शिंदे, योगेश दोडके, भारतभूषण बराटे, सचिन बराटे, त्र्यंबक मोकाशी, शुक्राभाऊ वांजळे, किरण बारटक्के, सचिन दांगट, मारुती किंडरे, अतुल दांगट, उमेश कोकरे, बाबू दोडके, प्रविण दांगट, अंकुश पायगुडे, दिलीप कदम, संतोष कदम, संजय धावडे, योगेश धावडे, सुरेश धावडे, भगवान मोरे, बाळासाहेब मोकाशी, रमेश धावडे, रमेश मोरे, गणेश धावडे, निखिल धावडे, सुनीत लिंभोरे, वसंत लोले, युवराज वांजळे, प्रशांत लांडगे, सुरेंद्र दांगट, अशोक सरपाटील, विनायक किंडरे, समीर दामगुडे, धनंजय मोकाशी, रेश्मा चेतन धावडे, संतोष शेलार, अशोक मोकाशी, विनायक किंडरे, सचिन धावडे, निरंजन धावडे, राहुल धावडे, अतुल धावडे, सौरभ मोकाशी उपस्थित होते.

बसचा मार्ग

कर्वे रोड, मनपा भवन, मुळा रोड, विश्रांतवाडी मार्गे आळंदी

बस भाडे-

एनडीए गेट (कोंढवे- धावडे) ते आळंदी

४५ रुपये

बस सुटण्याच्या वेळा-

एनडीए गेट (कोंढवे- धावडे)- सकाळी ६, १०:४०, दुपारी २:५५ संध्याकाळी ७:४५ वाजता,

आळंदी- सकाळी ७:५०, दुपारी १२:५०, संध्याकाळी ५ : ०५, रात्री ९:५५ वाजता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT