Doctor
Doctor 
पुणे

कोंढवे-धावडेला आरोग्य केंद्राची गरज

राजेंद्रकृष्ण कापसे

कोंढवे- धावडे - परिसरात कमी उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या जास्त आहे; मात्र येथे पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. खासगी रुग्णालयातील खर्च परवडत नसल्याने नागरिकांना उपचाराशिवाय दिवस काढावे लागत आहेत.

कोंढवे, न्यू कोपरे या दोन्ही गावांची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा जास्त आहे. कोंढवे-धावडे पासून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सांगरुण या गावात पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. नागरिकांना उपचारासाठी सांगरुण येथील रुग्णालयात धाव घ्यावी लागते. येथे जाण्यास पीएमपीची बससेवा तुरळक आहे. दोन्ही गावांत चिकुनगुनिया, डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. दोन वर्षांपूर्वी वेळेत योग्य उपचार न मिळाल्याने एका तरुणाचा डेंगीने मृत्यू झाला होता. त्या वेळी मुलाच्या उपचारासाठी आईने मंगळसूत्र विकले होते. 

कोंढवे-धावडे परिसरात भैरवनाथनगर, जयसेवालाल नगर, लमाणवस्ती, तर न्यू कोपरे गावातदेखील गावठाण येथे वार्षिक उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांची संख्या जास्त आहे. मजुरी व किरकोळ कामे करून येथील नागरिक आपला उदरनिर्वाह चालवतात. उपचारासाठी खासगी दवाखान्यात धाव घेणे गावकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे पुरेशी सुविधा नसल्याने नागरिकांची ससेहोलपट होत आहे. याबाबत आमदार भीमराव तापकीर म्हणाले, सरकारी आरोग्य सुविधा मिळण्यासाठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करणार आहे.

सरकारी दवाखाण्यात सांगरुणला जावे लागते. तिकडे जायचे म्हटले, की दिवस जातो. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खासगी दवाखाना परवडत नाही. गावात सरकारी दवाखाना सुरू झाला पाहिजे, असे नागरिक कमल शेखर जाधव यांनी सांगितले.

आरोग्य केंद्र उभारणीसाठी किमान ३० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या व इमारतीसाठी किमान २० गुंठे जागेची गरज असते. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत ठराव मंजूर झाला की तो राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडे पाठविणार आहोत. येथील नागरिकांची गरज लक्षात घेता या भागात आरोग्य केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू. 
- डॉ. दिलीप बोरा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी

आरोग्य केंद्रासाठी लागणारी २० गुंठे जागा आमच्याकडे आहे. येथे आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव आम्ही पाठविला आहे. 
-  नितीन धावडे, सरपंच 

आम्ही मोल मजुरी करतो. गावात सरकारी दवाखाना नाही. खासगी दवाखान्याचा खर्च परवडणारा नाही. किरकोळ आजार असल्यास दवाखान्यात न जाता घरगुती उपचार करतो. 
- पारूबाई परशुराम राठोड, नागरिक

६००० कोंढवे-धावडे कुटुंब संख्या
४०० न्यू कोपरे कुटुंब संख्या
२०० आहिरेगाव कुटुंब संख्या
३०,००० लोकसंख्या
२००० लोकसंख्या
१००० लोकसंख्या
३३,००० एकूण लोकसंख्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT