Koregaon Bhima Shauryadin Greet Vijayasthambhas sitting at home  said Vijay Stamb
Koregaon Bhima Shauryadin Greet Vijayasthambhas sitting at home said Vijay Stamb 
पुणे

कोरेगाव भीमा शौर्यदिन : ''विजयस्तंभास घरी बसूनच अभिवादन करा''

सकाळवृत्तसेवा

पुणे :  कोरोनोचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास घरी बसूनच अभिवादन करावे'' असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी आंबेडकरी समाजाला केले आहे. 
 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरेगाव भीमा येथील लढ्यातील शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादनाचा शौर्य दिन सोहळा साजरा केला जातो. सध्या कोरोनाचा संसर्ग सुरू असून, अद्याप धोका टळलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. 

कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम!

दरम्यान, सचिन खरात यांनी व्हिडिओच्या माध्यामातून आंबेडकरी समाजाला कोरोनाचा पार्श्वभूमीवर विजयस्तंभास घरी बसूनच अभिवादन कराण्याचे आवाहन केले आहे. ''जगामध्ये कोरोनामुळे मानवजातीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे आपण कोरोना विरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ''माझे कुटुंब माझी जबाबदारी'' यांच पालन केले पाहिजे. आपण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गौतम बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन घरी साजरा केला आणि डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घरी बसूनच अभिवादन केले. आजही पुण्यात कोरोना रुग्ण असल्यामुळे आपण भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभास घरी बसूनच अभिवादन करावे'' असे आवाहन  त्यांनी  व्हिडिओच्या माध्यामतून केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT