फटाका नव्हे पटकन खावे असे चॉकलेट sakal
पुणे

कोथरुड : फटाके उडवायचे नाहीत, खायचे

हे फटाके उडवायचे नाहीत तर चक्क खायचे आहेत

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड : हे फटाके उडवायचे नाहीत तर चक्क खायचे आहेत. ही वाक्ये ऐकून आपल्या डोक्यातही फटाके फुटतील. मँगो फ्लेवर, ड्राय फ्रूट, टू लेअर, डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिक्स चॉकलेट अशा विविध प्रकारा बरोबर फटाका चॉकलेट बाजारात आले आहे.

लहान मुलांना फटाक्यांचे आकर्षण असते. पण ते उडवताना मुलांना दुखापत होणार नाही ना याचीही चिंता पालकांना असते. मुलांची आवड व पालकांची चिंता यांचा मेळ घालणारे फटाका चॉकलेट बाजारात आले आहे.

गृहीणी असलेल्या मिलन मुलानी म्हणाल्या की, फावल्या वेळेत काय करायचे हा प्रश्न माझ्यापुढे होता. ग्यानरुची या संस्थेने चॉकलेट बनविण्याचा ऑनलाईन क्लास घेतला. त्यामध्ये मिळालेल्या शिक्षणानुसार मी चॉकलेट बनवले. संस्थेच्या माध्यमातून मला दहा हजार चॉकलेट बनविण्याची ऑर्डर आली. ती मी पुर्ण केली. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यातून नवे काही प्रयोग करण्याचा मी विचार केला. फेसबुकवर मी फटाका चॉकलेट पाहिले आणि तसे बनविण्याचा प्रयत्न केला.

त्याचा उपयोग माझ्या लहान मुलांना फटाके वाजवण्या पासून परावृत्त करण्यासाठी होवू शकतो. अग्नीबाण, भुईनळा, भुईचक्र, फटाका, लवंगी असे विविध प्रकारचे फटाके मी बनवले. फटाक्यांना जसे पॅकींग असते तशी त्याची रचना केली. समाज माध्यमावर त्याचे फोटो टाकले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. फावल्या वेळात करायचे काम म्हणून सुरु केलेला हा विषय एका छोट्या उद्योगामध्ये रुपांतरीत करण्याचा माझा प्रयत्न आहे.

माझे पती इंजिनियर आहेत. या प्रयोगाला मिळत असलेले यश पाहून त्यांनी व माझ्या सासरच्यांनीही यामध्ये सहकार्य केले. चॉकलेटसाठी योग्य रॅपर (आवरण), बॉक्स बाजारातून आणले. कमी घेणार असल्यामुळे त्याची किंमत महाग होती. परंतु प्रयोग म्हणून आम्ही हे धाडस केले. लोक या धाडसाला प्रतिसाद देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Student Protest: विद्यार्थी आंदोलनाचा दबाव वाढला, JPSC च्या ३ सदस्यांचा राजीनामा; झारखंडमध्ये मोठी घडामोड

बुमराह, साई सुदर्शनसह स्टार्स दुखापतग्रस्त; VVS Laxman यांचे टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, 'CoE केवळ रिहॅब सेंटर नाही, तर...'

काजू कतली खरेदी केली अन् डब्यात आढळल्या जिवंत अळ्या; ग्राहकाच्या तक्रारीनंतर FDAची मॉलवर कारवाई

Pune Nashik Highspeed Rail: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग बदलला; अमोल कोल्हेंच्या निष्क्रियतेमुळेच हे घडले, भाजपचा आरोप

Char Dham Security: चारधाम यात्रेच्या सुरक्षेसाठी ‘नभ नेत्र’ ड्रोन; ५ किमी परिसरातील भाविकांवर ठेवणार नजर

SCROLL FOR NEXT