पुणे

सातारा कोयना धरणात १०० टीएमसी पाणीसाठ्याचा टप्पा पार

CD

कोयना धरणात १०० टीएमसी
पाणीसाठ्याचा टप्पा पार

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाने यंदाच्या पावसाळ्यात १०० टीएमसी पाणीसाठ्याचा महत्त्वपूर्ण टप्पा रविवारी (ता. २३) रात्री उशिरा यशस्वीरीत्या ओलांडला आहे. सोमवारी (ता. २४) सकाळी ८ वाजताच्या नोंदीनुसार धरणातील एकूण पाणीसाठा १००.३८ टीएमसी (९५.३७ टक्के) इतका झाला आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेले हे धरण आता पूर्ण भरण्यासाठी अवघ्या ४.८७ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
धरणाची सध्याची जलपातळी २१५९ फूट ९ इंच (६५८.२९२ मीटर) असून उपयुक्त पाणीसाठा ९५.२६ टीएमसी म्हणजेच ९५.१४ टक्क्यांवर पोहोचला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात सध्या ७,४०७ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत आहे. धरणातून सध्या केडीपीएच, रेडियल गेट किंवा इतर कोणत्याही मार्गाने पाण्याचा विसर्ग सुरू नसून एकूण विसर्ग शून्य क्युसेक ठेवण्यात आला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा हा टप्पा गाठण्यास पाच दिवसांचा उशिर झाला आहे. २०२५ मध्ये १९ ऑगस्ट रोजीच धरणाने १०० टीएमसीचा आकडा पार केला होता.
पाणलोट क्षेत्रातील पावसाचा विचार केल्यास, २४ ऑगस्टच्या सकाळपर्यंत कोयना येथे २१ मिमी (एकूण ३,८९९ मिमी), नवजा येथे ३३ मिमी (एकूण ४,९६८ मिमी) तर महाबळेश्वर येथे एकूण ५,०४९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १०० टीएमसीचा टप्पा पार पडल्यामुळे सातारा, सांगलीसह संपूर्ण कृष्णा खोऱ्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असून सिंचन व वीजनिर्मितीच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar : नानाची वाडी झाली सुन्न! सिंहगडाच्या मातीत रमलेला, आणि येथेच विसावला; ग्रामस्थांची भावना

IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Dhruv Rathee Bengaluru Protest : ध्रुव राठी पहिल्यांदाच उतरला रस्त्यावर! बंगळूरमध्ये SIR विरोधात आंदोलन, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, मोदींवरही सडकून टीका

Latest Marathi News Live Update: अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री शिंदे पोहोचले

Viral Picture : डेल टेक्नॉलॉजीजच्या संस्थापकाच्या पत्नीला सोशल मीडियावर केले ट्रोल; संपत्ती वाचून डोळे पांढरे होतील..!?

SCROLL FOR NEXT