पुणे

वाई:-मधली आळीतील कृष्णाबाई उत्सव सुरू

CD

वाईतील मधली आळीतील कृष्णाबाई उत्सवास प्रारंभ

वाई, ता. २३ : येथील श्री कृष्णाबाई संस्थान घाट, मधली आळी ऊर्फ सत्यनाथपुरी यांचा कृष्णाबाईचा उत्सव आजपासून भव्य मिरवणुकीने सुरू झाला. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक उपक्रमाबरोबरच भजन, कीर्तन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवानिमित्त सकाळी साडेआठ वाजता श्रींना लघुरुद्र व ब्रह्मवंदातर्फे श्रीसूक्त अभिषेक झाला. त्यानंतर दहा वाजता श्री. भट यांचे घरी मंत्रजागर झाल्यानंतर साडेअकरा वाजता ‘श्री’ची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कृष्णामातेच्या मूर्तीची फुलांनी सजविलेल्या पालखीतून सवाद्य मिरवणूक म्हणजे ढोल ताशांच्या निनादात छबिना काढून आळीतून परिक्रमा पूर्ण करण्यात आली. उत्सवात उद्या (शनिवारी) सकाळी आठ वाजता ‘श्रीं’ना लघुरुद्र ब्रह्मवृंदातर्फे व श्रीसूक्त अभिषेक, दुपारी चार वाजता कृष्णाई भजनी मंडळ गंगापुरी, यांचे भजन, सायंकाळी पाच वाजता गार्गी भजनी मंडळ, धर्मपुरी यांचे भजन, तसेच रात्री साडेनऊ वाजता हभप कैलास खरे (रत्नागिरी) यांचे ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ या विषयावर सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रविवारी (ता. २५) सकाळी साडेआठ वाजता ‘श्रीं’ना लघुरुद्र ब्रह्मवृंदातर्फे श्रीसुक्त अभिषेक, दुपारी चार वाजता मैत्रयी ग्रुप यांचे श्रीसुक्त व स्तोत्र पठण, सायंकाळी पाच वाजता हळदी-कुंकू, रात्री साडेनऊ वाजता हभप श्री चारुदत्त आफळे (पुणे) यांचे ‘वंद्य वंदे मातरम्’ या विषयावर सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी साडेआठ वाजता श्रींना लघुरुद्र व ब्रह्मवृंदातर्फे श्रीसुक्त अभिषेक, सकाळी १० ते २.३० वाजेपर्यंत कृष्णाबाई संस्थानतर्फे महाप्रसाद, रात्री १० वाजता स्वरवैभव क्रिएशन (सांगली) प्रस्तुत, मराठी भक्तिगीते व भावगीते यांचा बहारदार कार्यक्रम परेश पेठे व कलाकार (सांगली) सादर करणार आहेत. मंगळवारी (ता. २७) सकाळी साडेआठ वाजता ‘श्रीं’ना लघुरुद्र व ब्रह्मवृंदातर्फे श्रीसुक्त अभिषेक, दुपारी दोन वाजता श्रीकृपा भजनी मंडळ यांचे भजन, दुपारी चार वाजता श्रीसुक्त पठण गंगापुरी, सायंकाळी पाच वाजता मुरलीधर भजनी मंडळ यांचे भजन, सायंकाळी साडेसहा वाजता मान्यवरांचे सत्कार व बक्षीस समारंभ, त्यानंतर रात्री दहा वाजता हभप हर्षद जोगळेकर, पुणे यांचे लळिताचे कीर्तन आणि दीपोत्सव होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. याशिवाय दररोज रात्री सात वाजता आरती व मंत्रपुष्प होणार असून, या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थानचे सरपंच चिंतामणी ऊर्फ रवींद्र महादेव मेहेंदळे यांनी केले आहे.

------
07497
वाई : मधली आळी कृष्णाबाई उत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत ओटी भरताना सुवासिनी भाविक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या दर्शनाची वेळ आणि नियम अचानक बदलले; आता VIP पास सुद्धा बंद, काय आहे कारण?

'मराठी सिनेमासाठी काय करतोय?' विलासराव देशमुखांनी रितेशला विचारलेला प्रश्न, वडिलांची इच्छा सांगताना म्हणाला...'सध्या मराठी भाषेला..'

Chakan News : काळ्या ऑइलवरील शेगड्यांकडे कल; चाकण परिसरामधील छोट्या हॉटेलचालकांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT