कृष्णा नदी दूषित
करणाऱ्यांवर कारवाई करणार
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष; पाण्याचे नमुने तपासणी अहवाल शासनाला पाठवणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने तसेच नदीचे पाणी दूषित होत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावरून होत आहेत. या पार्श्वभूमीवर नदीच्या पाण्याची तपासणी करून प्रदूषणास कारणीभूतांचा शोध घेतला जाईल. नदीचे पाणी दूषित करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सोमवारी (ता. २१) सोशल मीडियावरून बोलताना दिली.
जिल्हाधिकारी घोष म्हणाले, ‘‘कृष्णा नदीतील पाण्याची सद्यःस्थिती आणि प्रदूषणाबाबत पाटबंधारे विभागाशी संपर्क साधण्यात आला आहे. नदीच्या दोन्ही बाजूंच्या विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीतून पाण्याच्या गुणवत्तेची सद्यःस्थिती तसेच प्रदूषणाचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.’’
पाण्याच्या नमुना तपासणीचा सविस्तर अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. तसेच, या प्रश्नावर महापालिका प्रशासनाशीही चर्चा केली जाणार आहे. सांगली शहरातील नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचे नियोजन महापालिकेच्या समन्वयाने करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी घोष म्हणाले, ‘‘गणेश विसर्जनाच्या काळात नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी असल्याने प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीत कोणत्याही प्रकारचे दूषित पाणी सोडले जात आहे का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे. तपासणीत दोष आढळल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.