कृष्णा कारखान्यात सत्ता कोणाची?
आज फैसला; दोन फेऱ्यांत निकाल संपविण्याची तयारी
सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. २२ ः रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी उद्या (मंगळवार) होत आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव यांनी दिली. मतमोजणीसाठी ३५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. उद्या पोलिस बंदोबस्तही ठेवला असून, दोन शीघ्र कृती दलाच्या जवानांच्या तुकडीसह १२८ पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात केले आहेत.
येथील वखार महामंडळाच्या गोदामात कृष्णाची मतमोजणी होत आहे. तेथे ३२ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. केंद्रनिहाय होणारी मतमोजणी अवघ्या दोन फेऱ्यांतच संपविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे निकालादिवशी रात्री दहापर्यंत कारखान्यावर सत्ता कोणाची? हे स्पष्ट होईल. कारखान्यासाठी काल मतदान झाले. येथील वखार महामंडळाच्या गोदामात मतपेट्या ठेवल्या आहेत. उद्या सकाळी आठला मतमोजणीस सुरुवात होईल. त्यासाठी ७६ टेबल व त्या प्रत्येक ठिकाणी चार कर्मचारी आहेत. दोन फेऱ्यांत होणारी मतमोजणी पहिल्या फेरीत एक ते ७७ टेबलांवर, तर दुसऱ्या फेरीत एक ते ७६ टेबलांवर होईल. मतमोजणीदिवशी ओळखपत्र बंधनकारक आहे. मतदान केंद्रनिहाय मतमोजणी होणार असल्याने निकालाकडे सभासदांसह दोन्ही प्रमुख पॅनेलचे लक्ष लागले आहे.
प्रथम एक जागा असलेले राखीव गट, त्यानंतर दोन जागा असणारे गट व शेवटी तीन जागा असणाऱ्या गटांची मोजणी होईल. मतमोजणीसाठी एक पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलिस निरीक्षक, फौजदार, ६५ हवालदार, ५३ होमगार्ड व दोन तुकड्या शीघ्र कृती दलाच्या तैनात आहेत. मतमोजणी रात्री १० पर्यंत पूर्ण होईल, असे नियोजन केल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.
..................
चौकट
...................
दुपारी तीननंतर निकाल सुरू
नऊ तासांत मतमोजणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकाच वेळी मतमोजणी सुरू होईल. दुपारी तीननंतर निकाल येण्यास सुरुवात होईल.
.........................
चौकट
................
अशी होईल मतमोजणी
सर्व प्रथम अनुसूचित जाती/जमाती, त्यांनतर महिला, इतर मागास प्रवर्ग विमुक्ती जाती/भटक्या जमाती/विशेष मागासप्रवर्ग या गटाची मोजणी होईल. त्यानंतर गटनिहाय मोजणी होईल. त्यात गट क्रमांक एक वडगाव हवेली-दुशेरे, गट दोन काले-कार्वे, गट तीन नेर्ले-तांबवे, गट चार रेठरे हरणाक्ष- बोरगाव, गट पाच येडेमच्छिंद्र-वांगी आणि गट सहा रेठरे बुद्रुक- शेणोली.
W29073
कऱ्हाड ः वखार महामंडळाच्या गोदामात यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी तयारी पूर्ण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.