पुणे

श्री कुमारस्वामी जयंती व्याख्यानमाला

CD

PNE26W41469
कुमारस्वामीजी
---
PNE26W41468
राजेंद्र मायनाळ
---
कुमारस्वामीजींच्या चिंतनाने पोपही झाले होते प्रभावित
राजेंद्र मायनाळ : प्रार्थनायोग, शिवयोग अन् बसव तत्त्वज्ञानाचा देश-विदेशात प्रचार
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १० : ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू पोप जॉन पॉल द्वितीय यांची भेट घेताना महातपस्वी श्री कुमारस्वामीजींनी ख्रिश्चन धर्माचे केलेले सखोल विवेचन ऐकून पोपसह अनेक धर्मगुरू प्रभावित व आश्चर्यचकित झाले. विविध धर्म, योगमार्ग, विज्ञान व तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास असलेल्या कुमारस्वामीजींचे व्यापक चिंतन आणि अध्यात्माकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन या भेटीत प्रकर्षाने जाणवला. प्रार्थनायोग, शिवयोग व बसव तत्त्वज्ञानाचा देश-विदेशात प्रचार करून त्यांनी मानवकल्याणाचा मार्ग दाखविला, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय प्रार्थना योग मंडळाचे अध्यक्ष व लेखक राजेंद्र मायनाळ यांनी केले.
कुमारस्वामीजींच्या ११७ व्या जयंतीनिमित्त मंडळातर्फे आयोजित व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रमात ‘महातपस्वी श्री कुमारस्वामीजींचे जीवन व कार्य’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना मायनाळ बोलत होते. सिद्धेश्वर आण्णाराव पाटील प्रमुख पाहुणे होते.
---
सहा युरोप दौरे; योगाला वैज्ञानिक अधिष्ठान
कुमारस्वामीजींनी युरोपचे सहा वेळा दौरे केले. प्रार्थनायोगात आसन, बंध, प्राणायाम व मंत्रांचा वैज्ञानिक समन्वय साधला. यातून सप्तचक्र जागृतीसह साधकांना आरोग्य व मानसिक शांततेचा अनुभव मिळाला. राजयोग, लययोग, मंत्रयोग, शिवयोग, भक्तियोग व ध्यानयोगाचा त्यांनी सखोल अभ्यास केला. शरीरशास्त्र, विज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र व तत्त्वज्ञानावरही त्यांचे प्रभुत्व होते. तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांनी शिक्षणविषयक धोरणाची जबाबदारी देण्याची विनंती केली; मात्र त्यांनी ती नाकारून अध्यात्म, योगसाधना, तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला. इंग्रजी, कन्नड व हिंदीतील विपुल ग्रंथसंपदा असलेल्या स्वामीजींनी दोन वेळा जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. विविध राजकीय, धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचा गौरव केला होता.
---
मायनाळ यांचे अमृत महोत्सवी वर्ष
मायनाळ यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याने कार्यक्रमाला दुग्धशर्करा योग आला. योगविहार परिवारातील विश्वस्त, साधक, मित्रपरिवार व सहकाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक, आध्यात्मिक व संस्थात्मक कार्याचा गौरव केला. सूत्रसंचालन नागनाथ चौगुले केले. आभार विश्वनाथ म्हेत्रे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JPSC Exam Cancellation : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! जेपीएससीसह २०२३-२५ मधील अनेक परीक्षा होणार रद्द; झारखंड सरकारचा मोठा निर्णय

मुंबईचा शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला पुन्हा एकवटला; पाच संघटना आल्या एका छताखाली!

दूध, पनीरमध्ये भेसळ करणाऱ्यांचीआता खैर नाही; थेट मकोका अंतर्गत होणार कारवाई, उपमुख्यमंत्र्यानी दिले आदेश

Marathi News Live Updates : कनेक्टिंग लिंकची मुंबई मार्गिका उद्या तीन तासांसाठी बंद; वाहतूक द्रुतगतीने वळवणार, कारण काय?

Velhe water crisis: वेल्हे तहसील कार्यालयावर कादवे ग्रामस्थांचे हंडे घेऊन धरणे आंदोलन; पाणी योजनेचा वाद, पावसाळ्यातही टंचाई

SCROLL FOR NEXT