पुणे

कुसळंब गोळीबार प्रकरणी तिघांना अटक

CD

कुसळंब गोळीबार प्रकरणी तिघांना अटक
पाठलाग करत केले जेरबंद; ४ दिवसांची पोलिस कोठडी
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २७ : कुसळंब (ता. बार्शी) येथे गुरुवारी (ता. २६) दुपारी झालेल्या गोळीबार आणि लोखंडी रॉडने केलेल्या मारहाण प्रकरणी तिघा संशयित आरोपींना बार्शी तालुका पोलिसांनी करमाळ्याजवळ पाठलाग करत एका दिवसाच्या आत पकडले. त्यांना बार्शीच्या प्रथम वर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुसळंब येथील बाळासाहेब उकिरडे या तरुणास किरकोळ कारणावरून योगेश मोरे (वय २९, रा. कुसळंब, सध्या रा. शिंगोटे वस्ती, हडपसर, पुणे) याच्यासह राहुल गायकवाड (वय २६, रा. कुंभारगाव, ता. करमाळा), रोशन पिसाळ (वय ३२, रा. बागतीनगर, शंकर मंदिर शेजारी, माळवाडी, हडपसर, पुणे) या तिघांनी रॉडने मारहाण केली. तसेच त्याच्यावर बंदुकीने दोन गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला; परंतु उकिरडे हा थोडक्यात बचावला.
या घटनेनंतर तालुका पोलिसांनी सर्वत्र शोधपथके पाठवल्यानंतर सर्व संशयित आरोपी करमाळा परिसरात फिरत असल्याची गोपनीय आणि फोनच्या लोकेशनवरून माहिती मिळाल्यावरून, सुमारे ७ किलोमीटर पाठलाग करत बार्शी तालुका पोलिसांनी या तिघांनाही बंदूक, लोखंडी रॉड, कोयता, लाकडी दांडके आदी साहित्यासह जेरबंद करत त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना शुक्रवारी (ता. २७) न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यंत (२ मार्च) त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी ठोठावली आहे.
---
या पोलिस पथकाची कामगिरी
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी वळसने, हवालदार राजेंद्र मंगरूळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गवळी, हवालदार धनराज केकान, शिपाई राहुल बोंदर, ओमप्रकाश दासरे, बालाजी हंगे, सायबर पोलिस ठाण्याचे रतन जाधव यांनी ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT