रावेत - महापालिकेने सुरू केलेल्या स्कूलबस पाहून आनंदलेले वीटभट्टी व बांधकाम मजुरांची मुले.
रावेत - महापालिकेने सुरू केलेल्या स्कूलबस पाहून आनंदलेले वीटभट्टी व बांधकाम मजुरांची मुले. 
पुणे

वीटभट्टीवरील मुलांसाठी स्कूलबससेवा सुरू

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - रावेत व पुनावळे येथील वीटभट्ट्या आणि बांधकाम साइटवरील मजुरांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी महापालिकेतर्फे स्कूलबसची व्यवस्था सोमवारपासून (ता. २१) करण्यात आली. बसमधून शाळेत जाताना मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

रावेत, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी भागात अनेक वीटभट्ट्या असून अनेक बहुमजली गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे. तेथील मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी डोअर स्टेप स्कूल संस्थेतर्फे चार वर्षांपासून नियमित सर्वेक्षण सुरू आहे. अशा मुलांना शोधून महापालिकेच्या शाळेत दाखल करून शिक्षण दिले जाते. मात्र, मजूर राहात असलेल्या ठिकाणांपासून रावेत व पुनावळे येथील शाळांचे अंतर सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब आहे. त्यामुळे मुलांना पायपीट करावी लागत होती. इच्छा असूनही मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवू शकत नव्हते. अशा मुलांसाठी महापालिकेने स्कूलबसची व्यवस्था करावी, अशी मागणी मजुरांनी गेल्या महिन्यात महापालिका आयुक्तांकडे केली होती.

त्यांच्यासह मुलांनी दिवसभर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडले होते. त्याबाबत ‘सकाळ’ने ‘वीटभट्टीवरील मुलांसाठी हवी स्कूलबस’ असे वृत्त २२ डिसेंबरला प्रसिद्ध केले होते. स्थानिक नगरसेवकांसह महापालिका शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, स्थायी समिती सदस्या करुणा चिंचवडे, प्रज्ञा खानोलकर, शिक्षण समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, नगरसेविका रेखा दर्शिले, संगीता भोंडवे यांनी पुढाकार घेतला आणि रावेत व पुनावळे येथील शाळांमध्ये जाण्यासाठी सोमवारपासून स्कूलबससेवा सुरू झाली. यामुळे दोन्ही विभागांतील सुमारे ४०८ मुलांची सोय झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT