Lahuji Vastad Salve birth anniversary lights Arun Kumar Stadium pune
Lahuji Vastad Salve birth anniversary lights Arun Kumar Stadium pune sakal
पुणे

लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला अरुण कुमार स्टेडियम मध्ये दिव्यांचा झगमगाट

कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट : आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८व्या जयंती निमित्त पूर्वसंध्येला मातंग एकता आंदोलनच्या वतीने भवानी पेठेतील जन.अरुण कुमार वैद्य स्टेडियम येथे करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश बागवे म्हणाले की, या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सर्वात मोठे आद्य क्रांती गुरू लाभले आहे. त्यांचे ध्येय म्हणजे जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशा प्रखर राष्ट्र प्रेम असणाऱ्या महापुरुषाने अनेक क्रांतिकारक घडवले आहे. आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची खरी गरज आहे. आज त्यांच्या क्रांतीचा विचार करता राज्य व देश पातळीवर त्यांचा यथोचित गौरव किंवा स्मारक उभे करण्यात आली नाही नसल्याची खंत ही यावेळी बागवे यांनी व्यक्त केली.

यावेळी कार्याध्यक्ष अविनाश बागवे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. यावेळी छाया लांडगे यांनी काढलेली रांगोळी ही अनेकांचे लक्ष वेधून होती. दिपोस्त्वानंतर फटाक्यांची मोठी आतिषबाजी करण्यात आली. याप्रसंगी मातंग समाजाचे जेष्ठ नेते अंक्कल सोनावणे, विठ्ठल थोरात, अध्यक्ष पुणे शहर अध्यक्षा ॲड राजश्री अडसुळ, पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखा खंडाळे, अरुण गायकवाड, मधुकर चांदणे , संजय साठे, दयानंद अडागळे, सुनिल बावकर, मारुती कसबे, रोहीत अवचिते , हुसेन शेख, सचिन वाघमारे, लक्षमण चव्हाण, अदित्य गायकवाड, आदी व मान्यवर व महीला मोठ्या संख्खेने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ