पुणे

सावळेश्वर . . . भारनियम कमी करावे ; अन्यथा रस्ता रोको .

CD

SWA26B01252
सावळेश्वर (ता. मोहोळ) : येथील उपकार्यकारी अभियंता पटवेगर यांना निवेदन देताना विकास जाधव.
---
लांबोटी परिसरातील भारनियमन
बंद न केल्यास ‘रास्ता रोको’
दादा फाउंडेशनची महावितरणकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावळेश्वर, ता. २२ : मोहोळ तालुक्यातील लांबोटी व परिसरात सुरू असलेले भारनियमन तत्काळ बंद करून अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी दादा फाउंडेशन, लांबोटीच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली. यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता पटवेगर यांना निवेदन देण्यात आले असून, मागणीची दखल न घेतल्यास मंगळवार, २३ जून रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेल्या वीज कपातीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होत असून शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनाही विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे.
यापूर्वीही याच मागणीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, पोलिस निरीक्षक व लांबोटी महावितरण कार्यालयास देण्यात आल्या आहेत, अशी माहिती दादा फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भारत जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT