आठ अ उताऱ्यावरील रकान्यात करण्यात आलेली सुधारणा. 
पुणे

आठ अ उताऱ्यावर आता पोटखराबा नोंद

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर - सातबारा उताऱ्याप्रमाणेच आठ अ उताऱ्यावरही जमिनीच्या पोटखराबा क्षेत्राची नोंद करता येणार आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आठ अ उताऱ्यात सुधारणा करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्याचे सूचित केले आहे. 

सातबारा उताऱ्यावर लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब्याचे क्षेत्र आणि एकूण क्षेत्र यांचा समावेश असतो. तर आठ अ उताऱ्यात केवळ लागवडीयोग्य क्षेत्राचा समावेश करता यायचा. आठ अ उताऱ्यावरील जमिनीचे क्षेत्र आणि सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र यात तफावत दिसायची. अनेक जणांचे लागवडीयोग्य क्षेत्रापेक्षा पोटखराब्याचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे अनेकदा जमिनीवर कर्ज घेताना किंवा इतर काही प्रकरणे करताना त्या पोटखराबा क्षेत्राचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. सातबारा आणि आठ अ या दोन्ही उताऱ्यांवरील क्षेत्रांची आकडेवारी जुळविण्याची आवश्‍यकता असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

प्रत्येक तलाठी सजात गाव नमुना आठ अ उतारे सुधारित नमुन्यात ठेवण्याची दक्षता घेण्यात यावी, तसेच सातबारा संगणक प्रक्रियेमध्ये नमुन्यानुसार आवश्‍यक त्या सुधारणा करण्यात याव्यात, अशा सूचनाही महसूल विभागास देण्यात आल्या आहेत.

पोटखराब्यावर आकारणी नाही
आठ अ उताऱ्यात स्तंभ क्रमांक - ३ क्षेत्र या स्तंभात (३ अ) लागवडीयोग्य क्षेत्र, (३ ब) पोटखराबा क्षेत्र (लागवडीयोग्य नसलेले) आणि (३क) एकूण क्षेत्र असे तीन उपस्तंभ करून त्यात पोटखराबा क्षेत्राचा समावेश करण्यात यावा, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच रकाना (३अ) मधील लागवडीयोग्य क्षेत्रच आकारणीस पात्र राहील. तर पोटखराबा क्षेत्रावर आकारणी लागू असणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Killed in Tiger Attack : नागपूरमध्ये वाघाचा थरार! शेतात काम करणाऱ्या महिलेचा काळजाचा थरकाप उडवणारा अंत; संपूर्ण गाव दहशतीत!

Chh. Sambhajinagar: मी फील्डवर फिरतोय, तुम्ही का नाही? महसूलच्‍या अपर मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना तासले, विविध विभागांना अचानक भेटी

CM Devendra Fadnavis : ‘एआय’ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे; गुंतवणुकीसाठी सहकार्याचे सूतोवाच

Latest Marathi News Live Update : दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ११ कॉपीबहाद्दरांवर कारवाई

Sillod Truck Accident: ट्रक नाल्यात उलटून महिला ठार; सिल्लोड कन्नड मार्गावरील दुर्घटना, नऊ जण जखमी

SCROLL FOR NEXT