पुणे

बनावट कागदपत्रांद्वारे जमीन लाटण्याचा प्रयत्न

CD

​सासवड, ता. २२ : बनावट कागदपत्रे तयार करून आणि शासनाची दिशाभूल करून मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीवर स्वतःची वारस म्हणून नोंद केल्याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सन २०११ ते २०१४ या कालावधीत हा प्रकार घडला असून, याबाबत श्रीनाथ दत्तात्रेय कटके (वय ५५, रा. भारती विद्यापीठ, पुणे) यांनी सासवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार श्रीनाथ कटके यांचे आजोबा कृष्णा नारायण कटके यांच्या नावे भिवरी (ता. पुरंदर) येथे जमीन आहे. फिर्यादींनी या जमिनीवर वारस हक्काने नाव लावण्याचा प्रयत्न केला असता त्यांना समजले की गावातीलच इतर व्यक्तींनी देखील कृष्णा कटके यांचे वारस असल्याचे सांगून अर्ज दिले आहेत. हा विषय न्यायालयात प्रलंबित असताना धक्कादायक माहिती समोर आली.
तक्रारीनुसार, संशयित आरोपींनी त्यांचे वडील ‘किसन नारायण कटके’ यांचे नाव बदलून कागदपत्रांवर ‘कृष्णा नारायण कटके’ असे केले. या खोट्या नावाचा आणि बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांनी महसूल विभागाची फसवणूक केली आणि स्वतःची व आपल्या वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर लावून घेतली. मूळ वारस जिवंत असताना आणि जमीन नावावर करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच हा बनावट प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत पोपट किसन कटके, लालासाहेब दत्तात्रेय कटके, तुषार दत्तात्रेय कटके, सागर पोपट कटके, सुशीला दत्तात्रेय कटके, सुरेखा दत्तात्रेय कटके (सर्व रा. भिवरी) यांसह तीन मयतांची नावे तक्रारीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सासवडचे साहाय्यक पोलिस निरीक्षक वैभव सोनवणे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT