land 
पुणे

पुणे : जागा वनविभागाची दाखविली खासगी

दिलीप कु-हाडे

पुणे : खराडी ते शिवणे नियोजित रस्त्याच्या दरम्यान येणारी पावणे दोनशे वृक्ष काढण्यात येणार आहेत. त्यापैकी ७५ वृक्ष वन विभागाच्या जागेतील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याच्या जागेतील आहेत. मात्र महापालिकेने पावणे दोनशे वृक्ष एकट्या वाडिया बंगल्यातील असल्याचे दाखविले आहे. तर कल्याणीनगर येथील ५९२ वृक्षतोडणाऱ्यांवर गुन् महापालिका अधिकारीच अभय देत आहेत.

या संदर्भात क्लिन रिव्हर सोसायटीचे समीर निकम म्हणाले, ‘‘ मुळा -मुठा नदी पात्राशेजारील सर्व्हे क्रमांक २२८ ते २३२ ही जागा वाडिया स्टड फार्मच्या मालकीची आहे. तर सर्व्हे क्रमांक २३३ मधील तीन एकर जागा वन विभागाच्या मालकीची आहे. ते सध्या डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्य आहे. या अभयारण्यात ७५ मोठे वृक्ष आहेत. महापालिकेने ही जागा केवळ वाडिया स्टड फाॅर्मची असल्याचे दाखविले आहे. तसेच उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीने सुद्धा जागेच्या कागदपत्रांची शहानिशा न करता अहवाल तयार केला. सबंधित रस्त्यातील वृक्ष काढण्यासाठी व इतरत्र पुर्नेरोपण करण्यासाठी हाच अहवाल महापालिका आयुक्तांना सादर केले.’’ 
महापालिका आयुक्तांनी अहवाल पाहून त्यांनी वृक्ष काढणे व पुर्नेरोपन करण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारची परवानगी न घेताच ७५ वृक्ष तोडले जाणार आहेत. हा न्यायालयाचा अवमान आहे. संबंधित विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक असताना केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या वृक्षांची तोड होत आहे. त्यामुळे पक्षी अभयारण्यातील जैवविविधतेला धोका तर निर्माण होणारच आहे. त्याबरोबरच उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार असल्याचे निकम यांनी सांगितले. 

कल्याणीनगर येथील ५९२ वृक्षतोडणाऱ्यांना अभय 
कल्याणीनगर येथे एका बांधकाम व्यवसायिकाने तब्बल ५९२ वृक्ष तोडले आहेत. विधी सल्लागार विभाने संबंधित व्यवसायिकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. मात्र उद्यान अधिक्षक गेल्या दाेन महिन्यांपासुन अहवालावर सहीच करीत नाहीत. त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांना अभय मिळत असल्याचा आरोप समिर निकम यांनी केला आहे. 

‘‘ डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याचा सर्व्हे क्रमांक माहित नाही. त्यामुळे येथील वृक्षतोड बाबत सांगता येत नाही. कल्याणीनगर येथील ५९२ वृक्षतोडीच्या संबंधित माहिती वरिष्ठ अधिकारीच देऊ शकतील. ’’
स्नेहल हरपळे, सहायक उद्यान अधिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT