Pune Rain Update Sakal
पुणे

Pune Rain Update : शिरगांव येथे रस्त्यावर दरड कोसळली, भिमाशंकर- भोरगिरी कडे जाणारी वाहतूक ठप्प

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शिरगांव ( ता. खेड ) येथे शिरूर-भिमाशंकर मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील भोरगिरी-भिमाशंकर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून सार्वजणीक बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे.

राजेंद्र लोथे

चास : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील शिरगांव ( ता. खेड ) येथे शिरूर-भिमाशंकर मार्गावर दरड कोसळल्याने या मार्गावरील भोरगिरी-भिमाशंकर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून सार्वजणीक बांधकाम विभागाच्या वतीने तातडीने दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे.

गेली चार दिवसांपासून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पावसाची संततधार सुरू असून बुधवार ता. २४ पासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. प्रत्यक्षदर्शी शिरगांव येथील रहिवाशी स्वप्निल शिर्के यांनी सांगीतले की पावसाचा जोर सुरूच असून बुधवारी रात्री किंवा गुरूवारी पहाटेच्या दरम्यान शिरूर-भिमाशंकर मार्गावर हि दरड कोसळली असून मोठ्या प्रमाणावर माती, दगड तसेच मोठी झाडे रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून रस्ता पुर्णपणे निसरडा झाला आहे.

या बाबत सार्वजणीक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राम जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगीतले की तातडीने यंत्रणा कामाला लावली असून दोन जे सी बी मशीनच्या साह्याने मलबा हटवण्याचे काम सुरू केले असून रस्ता वाहतुकूसाठी लवकरच खुला केला जाईल. सद्य स्थितीत तरी कोणतीही हाणी झाल्याची माहिती नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Madhya Pradesh: वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी; ६२ खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे

'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

Latest Marathi News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात तपासाला वेग; आरोपीच्या शोधासाठी ९ पथके सक्रिय

IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

SCROLL FOR NEXT