Dr-Prasad-Joshi 
पुणे

Video : पुण्यात तयार होतोय सर्वांत मोठा शब्दकोश

नीला शर्मा

पुण्यातील डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाच्या संस्कृत कोशशास्त्र विभागातर्फे जगातील सर्वांत मोठा शब्दकोश  तयार केला जात आहे. वीस लाखांहून अधिक शब्दांचं संकलन तसेच त्यांचे अर्थ व एक कोटीपेक्षा जास्त संदर्भांचं संकलन या ऐतिहासिक कोशात आहे. संस्कृत शब्दांचे अर्थ इंग्रजी भाषेतही दिल्यामुळे हा कोश जागतिक पातळीवर विविध क्षेत्रांतील अभ्यासकांसाठी माहितीचं विशाल भांडार ठरणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या भव्य कोशाची निर्मिती १९४८ पासून सुरू आहे. प्रकल्पाचे प्रधान संपादक व विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.प्रसाद जोशी म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात वेदकाळापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या संस्कृत ग्रंथांचं वाचन, चाळीस तज्ज्ञांकडून नव्यानं करण्यात आलं. या वेळी प्रत्येक शब्दाच्या संदर्भांच्या नोंदी केल्या गेल्या. वीस लाखांहून अधिक शब्दांच्या या संकलनात प्रत्येक शब्दाचे सर्व प्रकारचे संदर्भ दिले आहेत.

उदाहरणार्थ, अग्नी हा शब्द वेदकाळापासून कोणत्या ग्रंथात, कोणत्या अर्थ व संदर्भात वापरला गेला. पुढे त्यात कसे बदल झाले वगैरे. असे एक कोटीपेक्षा जास्त संदर्भ या कोशात बघायला मिळतात. प्राचीन भाषा असलेल्या संस्कृतचा सुमारे चार हजार वर्षांचा इतिहास आहे. १९७६ पासून याचं संपादन सुरू झालं. दर वर्षी एक या प्रमाणे आतापर्यंत ३४  खंड प्रकाशित झाले आहेत. अधिकृत माहितीच्या या स्रोताची निर्मिती प्रक्रिया अत्यंत अवघड होती. हा कोश प्रमाणभूत ऐतिहासिक तत्त्वांवर आधारलेला आहे. कोणता शब्द प्रथम कोठे व कोणत्या अर्थाने वापरलेला आढळला, नंतर त्यात काळाच्या ओघात कोणते बदल होत गेले, तो शब्द केव्हापासून लुप्त झाला यांसारखी विविधांगी माहिती आहे.’

जोशी यांनी असंही सांगितलं की, शब्द व त्यांचे अर्थ यांच्यातील नात्याचं विश्वच वेगळं असल्याचा प्रत्यय या प्रकल्पातील सर्व सहभागींना येतो. आंतरराष्ट्रीय भाषेत ही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने इंग्रजीतही शब्दार्थ दिले आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा ओट्स पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 7 नोव्हेंबर 2025

अग्रलेख : स्फोटानंतरचा धुरळा

Panchang 7 November 2025: आजच्या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT