The late arrival of the King of Alphonso mango Fruit this year 
पुणे

फळांच्या राजाचे यंदा उशिरा आगमन

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : अवेळी आणि जास्त कालावधीसाठी झालेला पाऊस, उशिराने सुरु झालेली थंडी यामुळे आंबा हंगामावर विपरीत परिणाम होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा हंगाम जवळपास एक महिना उशिरा सुरु होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.

मार्चमध्ये आंब्याची आवक अतिशय अल्प राहील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. एकंदरीतच आंबा उपलब्धतेचा कालावधी यंदा कमी असणार आहे. त्यामुळे राज्याच्या पणन मंडळाकडून आंब्याच्या निर्यातवाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती मंडळाचे व्यवस्थापक सतीश वराडे यांनी दिली. विकसित देशांना आंबा निर्यातीसाठी क्रमप्राप्त असलेली मँगोनेट नोंदणी कृषी विभागामार्फत करण्यात येते. या नोंदणीसाठी कृषी विभाग व पणन विभाग यांचे संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम, शेतीशाळा अशा उपक्रमातून शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

ताज्या आकडेवारीनुसार यंदा साडेबारा हजार आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मँगोनेट अंतर्गत नोंदणी झाली आहे. यामध्ये हापूस आंब्याचे नोंदणी झालेले शेतकरी सुमारे ९ हजार असून अजूनही शेतकऱ्यांची नोंदणी सुरु असल्याचे वराडे यांनी सांगितले. आंब्याला भौगोलिक संकेतांक नोंदणी अर्थात जीआय प्राप्त झाली असून कोकणातील आंबा हापूस या नावाने विक्री करता यावा व इतर भागातील उत्पादित आंब्याची भेसळ होवू नये, यासाठी भौगोलिक संकेतांक नोंदणीसाठी आंबा उत्पादक, विक्रेते, निर्यातदार व खरेदीदार यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने कृषी पणन मंडळामार्फत प्रयत्न करण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हापूस आंब्याला भौगोलिक संकेतांक
सध्या ३६८ आंबा उत्पादक नोंदणी झाली आहे. आंबा विक्रेते, खरेदीदार, व्यापारी, निर्यातदार अशा एकूण ६९ घटकांची नोंदणी झालेली आहे. जास्तीत जास्त उत्पादकांनी भौगोलिक संकेतांक नोंदणी करून घ्यावी, यासाठी नोंदणी करणाऱ्या संस्थांबरोबर पणन मंडळ प्रयत्नशील आहे.

आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राची उभारणी
आंतरराष्ट्रीय पातळीवर आवश्यक निकषांची पुर्तता करून व्हेपर हीट ट्रीटमेंट सुविधा, विकीरण सुविधा तसेच भाजीपाला प्रक्रिया केंद्र या तीनही अद्ययावत सुविधांची उभारणी वाशी नवी मुंबई येथे केली आहे. पणन मंडळाच्या भाजीपाला प्रक्रिया केंद्र वाशी येथून आंब्यावर उष्णजल प्रक्रिया करून युरोपियन देशांना निर्यात करण्यात येते. अमेरिका व आॅस्ट्रेलियाकरीता आवश्यक असलेली तीन मिनिटांची ५० ते २०० पीपीएम सोडियम हायपोक्लोराईडची ५२ डिग्रीच्या प्रक्रियेकरीता सुविधा तयार केली आहे. दक्षिण कोरिया, जपान, न्यूझीलंड, अर्जेंटिना, मलेशिया येथे निर्यातीसाठी प्रयत्न सुरु आहेत.

काय सांगता! ट्रकपेक्षाही विमानाचं इंधन स्वस्त

बागायतदारांची मँगोनेटमध्ये नोंदणी, निर्यातवृध्दीसाठी योजना, देशांतर्गत विक्री व्यवस्थेच्या नियोजनामुळे यंदा आंबा उत्पादनावर परिणाम झाला असला तरी उत्पादकांना चांगला दर प्राप्त होऊन ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा उपलब्ध होण्यासाठी मदत होईल. कृषी पणन मंडळाने आंबा हंगाम २०२१ चे नियोजन सुरु केले आहे. मंडळामार्फत आंबा विक्रीसाठी महोत्सव व निर्यातीबाबत कार्यशाळा, आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातदार व्हावे, यासाठी निर्यात प्रशिक्षण कार्यक्रम व अपेडाच्या सहकार्यातून आंब्यासाठी खरेदीदार विक्रेता संमेलनाचे नियोजन करण्यात येत आहे.
- सुनील पवार, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक

यामुळे आंबा हंगाम उशिरा
- अवेळी आणि जास्त काळ पाऊस
- पावसामुळे आंब्याला मोहोराऐवजी पालवी
- मोहोर येण्याची प्रक्रिया उशिराने सुरु
- उशिराने सुरु झालेली थंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT