पुणे

वकिल उमेश मोरे यांच्या खूनप्रकरणात आणखी एका वकीलाला अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळून वकिल उमेश मोरे यांचे अपहरण करुन त्यांचा खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका वकीलाला अटक केली आहे.

घनश्याम पोपट दराडे (वय 33, रा. कात्रज) असे या वकिलाचे नाव आहे. ऍड. दराडे हा पुणे बार असोसिएशनच्या विद्यमान कार्यकारणीत सचिव आहे. याप्रकरणी यापूर्वी तिघांना अटक करण्यात आली असून त्यात एका वकिलाचा समावेश आहे. कपिल विलास फलके (वय-34,रा.चिखली), दीपक शिवाजी वांडेकर (वय 28, रा.साले वडगाव, ता.आष्टी, बीड) आणि ऍड. रोहित दत्तात्रेय शेंडे (वय 32, रा.पुणे) यांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. याबाबत ऍड. मोरे यांचे भाऊ प्रशांत मोरे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. या पूर्वी अटक आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत उद्या (ता. 29) संपत आहे. अटक आरोपी दराडेने अॅड. मोरे कोठे आहे, याची माहिती आरोपी फलके आणि शेंडे यांना मोबाइलवरुन दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मोरे यांच्या खून प्रकरणात आणखी मुख्य सूत्रधार असून त्यांचे इतर साथीदार या गुन्ह्यात सहभागी असल्याचे ठोस पुरावे मिळाले पोलिसांना मिळाले आहेत. ऍड. मोरे यांच्या अंगावरील कोट व बॅग देखील जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी नक्की कोणत्या कारणास्तव अत्यंत क्रूरपणे खून केला याचा तपास सुरू आहे. आरोपींनी पूर्व नियोजित कट करून हा खून केला आहे. आरोपींनी ऍड. मोरे यांना ज्या कारमधून खून करण्यासाठी पळवून नेले त्या कारवरील नंबर प्लेट बदलून त्यावर बनावट नंबरप्लेट वापरण्यात आली आहे होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT