पुणे

कीटकांच्या परिसंस्थेचे उलगडणार योगदान;आयुकाच्या स्थापनादिनी डॉ. राघवेंद्र गडगकर यांचे व्याख्यान 

सकाळवृत्तसेवा

पुणे - जीवसृष्टीच्या फलण्याफुलण्यामध्ये सर्वाधिक योगदान असलेल्या कीटकांची परिसंस्था, शांतता आणि युद्धातील किटकांमधील संघर्ष व सहकार्य अशा विविध पैलूंचे रहस्य तुम्हाला घरबसल्या पहायला मिळणार आहे. कारण, बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्थेतील (आयआयएससी) ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. राघवेंद्र गडगकर यांच्या या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) स्थापनादिवशी म्हणजेच मंगळवारी (ता. 29) या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुकाच्या युट्यूब चॅनेलवर संध्याकाळी पाचला याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. "आयुका'चा हा 32 वा वर्धापनदिन असून, प्रथमच विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या थेट उपस्थितीशिवाय हा साजरा होत आहे. ऑनलाईन व्याख्यानासाठी http://www.youtube.com/IUCAASciPOP/live या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयुकाचा स्थापनादिवस केवळ संस्थेसाठी नाही तर लोकांसाठी असतो. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्‍य नाही. त्यामुळे अशा ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यायाने आम्ही जगभरातील लाखो विज्ञानप्रेमींपर्यंत पोहचत आहे. 
- प्रा. सोमक रायचौधरी, संचालक, आयुका. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT