पुणे

वकिली व्यवसाय नसून समाजकार्याचे साधन

CD

ओझर,ता. १ समाजातील प्रत्येक घटकांना न्याय मिळवून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. वकिली हा व्यवसाय नसून समाज कार्याचे साधन आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पुणे जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती आरिफ सा. डॉक्टर यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समिती, जुन्नर आणि तालुका बार असोसिएशन मार्फत श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन, ओझर (ता.जुन्नर) येथील विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती आरिफ बोलत होते. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र के महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. सुजित शेलार, तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत हडावळे, वकील संघाचे पदाधिकारी, पक्षकार उपस्थित होते.
न्यायाधीश महेंद्र के महाजन म्हणाले की,मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत रस्त्यांवरील वरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यूबाबत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यू झाल्यास पाच लाख, जखमी झाल्यास दुखापतीच्या तीव्रतेनुसार ५० हजार ते अडीच लाख रुपयांच्या दरम्यान नुकसान भरपाई मिळते. त्याबाबत मृताच्या कायदेशीर वारसांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून नुकसानभरपाई करिता जिल्हास्तरीय समितीकडे माहिती देणे आवश्यक आहे. कारवाई न झाल्यास पीडितांनी किंवा कुटुंबीयांनी थेट जिल्हा विधी सेवा सेवा प्राधिकरणाकडे दावे दाखल केल्यास त्यांना भरपाई किंवा उपाययोजनांचा पाठपुरावा करण्यास मदत करण्यात येते असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायमूर्ती डॉक्टर यांच्या हस्ते काही लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रशस्तीपत्रक देण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्टॉलला भेट देवून योजनांची माहिती घेतली. सिंहगड विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ''बालविवाह व हुंडाबळी मुक्ती''या विषयावर जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT