lenyadri sakal
पुणे

लेण्याद्री लेणी समूहातील लेण्या पर्यटकांसाठी खुल्या

लेण्याद्री येथील लेणीसमूहात २८ लेण्या असून त्यापैकी सात क्रमांकाच्या गणेश लेणीत अष्टविनायक गिरीजात्मजकाचे स्थान आहे.

दत्ता म्हसकर

जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री ता.जुन्नर येथील लेणीसमूह लेणी अभ्यासक व पर्यटकांसाठी आज शनिवार ता.१९ पासून पुरातत्व विभागाकडून खुल्या करण्यात आल्या असल्याचे पुरातत्व विभागाचे संरक्षक सहायक बाबासाहेब भोसले यांनी सांगितले.

लेण्याद्री येथील लेणीसमूहात २८ लेण्या असून त्यापैकी सात क्रमांकाच्या गणेश लेणीत अष्टविनायक गिरीजात्मजकाचे स्थान आहे. ही लेणी देखील खुली झाली आहे मात्र गाभारा बंद ठेवण्यात आला आहे त्यामुळे गणेश भक्तांना किमान मुख दर्शन घेता येणार आहे.

सात व चौदा क्रमांकाच्या लेण्यात बौध्द चैत्य स्तूप असून अन्य लेण्या रिकाम्या आहेत.त्यांचा राहण्यासाठी तसेच ध्यानधारणेसाठी उपयोग करण्यात येत असावा.

जिल्ह्यातील भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके खुली करण्याचा निर्णय झाल्याने आज शनिवारी ता.१९ रोजी लेण्याद्रीला पर्यटकांची वर्दळ वाढली होती. त्यामुळे लेण्याद्रीच्या पायथ्याशी असणारी लहान मोठी दुकाने सुरू करण्यात आली. पर्यटकांनी कोव्हीड-१९ च्या अनुषंगाने शारिरीक अंतर बाळगणे, मास्कचा तसेच सॅनिटायझर वापर करणे बंधनकारक असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

मुलीचा हात ओढणं किंवा शिट्टी वाजवणं हा लैंगिक...; मद्रास हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं काय सांगितलं?

Land Deal Probe: निवडणुकीनंतर महिनाभरात कोट्यवधींची जमीन खरेदी? देवदत्त निकम यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT