Leopard
Leopard 
पुणे

बिबट्यानं नेलं, सरकारनंही नाही दिलं!

नवनाथ भेके

९०२ हल्ला प्रकरणांतील ९३ लाख रुपयांची भरपाई मिळणे अद्याप बाकी
निरगुडसर - बिबट्याने हल्ले करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड तालुक्‍यात २०२० मध्ये गेल्या आठ महिन्यांत १०२९ प्रकरणे मंजूर होऊन त्यातील १२७ प्रकरणातील १३ लाख रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळाले. परंतु अजून ९०२ प्रकरणातील ९३ लाख रुपयांची भरपाई मिळणे बाकी आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर वनविभांतर्गत आंबेगाव तालुक्‍यात मंचर व घोडेगाव विभाग, जुन्नर तालुक्‍यातील जुन्नर व ओतूर, खेड तालुक्‍यात चाकण व खेड व शिरूर तालुक्‍यात शिरूर असेच सात विभाग येतात गेल्या वीस वर्षांत बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण आंबेगाव तालुक्‍यातील मंचर विभाग, जुन्नर तालुक्‍यातील ओतूर विभाग व शिरूर तालुक्‍यातील शिरूर विभागात सर्वाधिक आहेत. आंबेगाव, जुन्नर, खेड व शिरूर तालुक्‍यात गेल्या वीस वर्षांत तीस जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असून १०५ जण जखमी झाले आहेत. तसेच ८८६६ पाळीव प्राण्यांवर हल्ला होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्यांचा पंचनामा होऊन प्रकरण मंजूर होऊन त्याची नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर  जवळपास महिन्याच्या आतच जमा केली जाते. परंतु कोरोनामुळे सरकारकडून अनुदान मिळत नसल्याने गेल्या आठ महिन्यांपासून ९०२ प्रकरणे मंजूर झाली आहेत. परंतु त्याची भरपाई अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासीनता आहे. गेल्या आठ महिन्यांत १०२९ प्रकरणे मंजूर होऊन त्यातील १२७ प्रकरणातील १३ लाख रुपये संबंधित शेतकऱ्याला मिळाले. परंतु अजून ९०२ प्रकरणासाठी ९३ लाख रुपयांची भरपाई मिळणे बाकी आहे.

वीस वर्षांतील आकडेवारी 
(आंबेगाव, जुन्नर, शिरूर, खेड)

  • बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू - ३३ नागरिक (नुकसानभरपाई १ कोटी १६ लाख)
  • जखमी - १०५ नागरिक (नुकसानभरपाई १ कोटी ५४ लाख)
  • पाळीव प्राण्यांचा मृत्यू - ८८६६ (नुकसानभरपाई ५ कोटी २५ लाख)

माझे दोन बकरे व करडू बिबट्याच्या हल्ल्यात ठार होऊन आठ महिने झाले. अंदाजे २५ ते २७ हजार रुपये नुकसान झाले आहे. ३१ मार्च रोजी वनविभाकडून पंचनामा करण्यात आला होता. पंचनामा होऊन तब्बल आठ महिने उलटले तरी अद्याप भरपाई मिळाली नाही. भरपाई त्वरित मिळावी ही अपेक्षा आहे.
- संदीप पोखरकर, बेलसर वाडी, ता. आंबेगाव

गेल्या आठ महिन्यांपासून पशुधन भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या सरकारकडे पैसे उपलब्ध नसल्याने ही वेळ आली आहे. निधीची मागणी करण्यात आली असून निधी आल्यानंतर तातडीने पैसे प्रकरणे मंजूर असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येतील.
- अजित शिंदे, वन अधिकारी, मंचर विभाग

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT