Corona Updates: विमानाने पुण्यात आलेले 21 प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

Passengers_Airport
Passengers_Airport

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला रोखण्यासाठी काही राज्यांतून विमानाने पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली असता त्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाची टेस्ट केल्याचा अहवाल नसलेल्या 507 प्रवाशांची विमानतळावर चाचणी करण्यात आली होती.

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतील विमान प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने ही तपासणी करण्यात आली आहे. देशातील काही राज्यांमध्ये दिवाळीपूर्वी कोरोनाचा जोर ओसरला होता. मात्र काही राज्य त्यास अपवाद ठरली. त्यामुळे त्या राज्यातून विमानाने पुण्यात येणाऱ्यांनी स्वतःची कोरोना तपासणी करून घेणे बंधनकारक आहे. ज्यांची टेस्ट झालेली नाही, त्यांची येथे उतरल्यानंतर टेस्ट करण्यात येत आहे.

पुणे विमानतळावर एक डिसेंबरपर्यंत दिल्लीतून सर्वाधिक 12 हजार 240 प्रवासी पुण्यात आले आहेत. त्यानंतर राजस्थानमधून 972 आणि गुजरातमधील 560 प्रवासी पुण्यात आले आहेत. तर या कालावधीत गोव्यातून एकही विमान शहरात आले नाही. चाचणी करतेवेळी यावेळी या प्रवाशांचा संपर्क क्रमांक घेतला जातो. चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना आणि पालिका प्रशासनाला कळवून पुढील कार्यवाही केली जात आहे. रेल्वे प्रवाशांना लक्षणे दिसल्यास स्थानकावरच अँटीजेन चाचणी केली जात आहे.

विमानतळावर दाखल झालेल्या एकूण 13 हजार 772 प्रवाशांपैकी 507 प्रवाशांकडे आरपीसीआर चाचणीचा अहवाल नव्हता. त्यांची विमानतळावर चाचणी करण्यात आली. त्यापैकी 21 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण सुमारे चार टक्के आहे.
- कुलदीप सिंग, विमानतळ संचालक

विमानतळावरील चाचण्यांची स्थिती
ठिकाण आणि एकूण प्रवासी
गुजरात - 560
दिल्ली - 12,240
राजस्थान - 972
एकूण - 13,772
आरटीपीसीआर - 507
बाधित - 21

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com