पुणे

निमगाव म्हाळुंगी, कासारीत बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २४ : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी व कासारी गावातील परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला असून, पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे. येथील परिसरात बिबट्याने पुन्हा दहशत निर्माण केली आहे.
निमगाव म्हाळुंगी येथील दत्तात्रेय किसन शिवले यांच्या गाईचे वासरू बुधवारी (ता.२४) पहाटे ठार करून नुकसान केले आहे. सकाळी वनरक्षक पूनम जाधव यांनी बिबट्याने ठार केलेल्या वासराचा पंचनामा केला आहे. दरम्यान, कासारी येथील मेंढपाळ रंगनाथ दगडे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर बुधवारी पहाटे बिबट्याने हल्ला करून एक शेळी व एक मेंढी गंभीर जखमी केली आहे. विशेष म्हणजे गळ्याला बिबट्याने चावा घेतल्याने शेळी व मेंढी गंभीर जखमी झाली आहे. दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे. दगडे यांच्या जखमी झालेल्या शेळी व मेंढीची पाहणी वनरक्षक पूनम जाधव यांनी केली आहे.

वर्षभरात १७ शेळ्या-मेंढ्या केल्या फस्त
कासारी येथील मेंढपाळ रंगनाथ दगडे यांच्या मेंढ्यांच्या कळपावर गेल्या वर्षभरात बिबट्याने हल्ला करून सुमारे १७ शेळ्या-मेंढ्यांचा जीव घेतला आहे. त्यापैकी दोन शेळ्या व एका मेंढीचे एकूण ३२ हजार रुपये आर्थिक नुकसान भरपाई वनविभागाकडून मिळाली असून, उर्वरित शेळ्या-मेंढ्यांची भरपाई अद्याप मिळाली नसल्याचे दगडे यांनी सांगितले.

पाळीव जनावरांना व प्राण्यांना बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मेंढपाळांनी व पशुपालकांनी संरक्षक भिंत किंवा कठीण जाळी बसवावी. निमगाव म्हाळुंगी व कासारी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची व्यवस्था वनविभागामार्फत करण्यात येईल. नागरिकांनी बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. बिबट्याच्या हालचालींविषयी ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधावा.
- पूनम जाधव, वनरक्षक, तळेगाव ढमढेरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. आर. रहमान यांच्या मुलाचा अपघात; पहाटे 3 वाजता Porsche ची धडक

Marathi News Live Updates : JPSC-JSSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला आक्रमक वळण; लाठीचार्जनंतर विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या दिशेने भिरकावल्या चपला, बाटल्या

Blocked Nose: सर्दी नाही तरी रात्रीच्या वेळी नाक का बंद होते? जाणून घ्या कारण आणि सोपे उपाय!

Mumbai Train Disturb: मुलुंड स्टेशनमध्ये ट्रेनवर काहीतरी पडले; आग लागली.. धुरांचे लोट अन् मध्य रेल्वेची वाहतुक विस्कळीत Video

Bhudargad Fort Wall Collapse : अवघ्या 2 वर्षांत ऐतिहासिक भुदरगड किल्ल्याची 50 फूट लांबीची तटबंदी कोसळली; कोट्यवधींचा निधी पाण्यात, गडप्रेमींचा तीव्र संताप

SCROLL FOR NEXT