Dr. Amol Kolhe and Bhupendra Yadav Sakal
पुणे

Leopard : बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करावे - खासदार डॉ. अमोल कोल्हे

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

रवींद्र पाटे

नारायणगाव - जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट प्रजनन नियंत्रण करावे. तसेच या चारही तालुक्यात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करावा.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या या मागणीला प्रतिसाद देत या संदर्भात तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव आणि वनविभागाचे महासंचालक चंद्र प्रकाश गोयल यांनी दिले आहेत. अशी माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मानवी वस्त्यांत पाळीव जनावरे व शेतकऱ्यांवर बिबट्यांकडून होणारे हल्ले वाढले आहेत. या हल्ल्यात अनेक लहान मुलांसह शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्या नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नाही.

बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावणे पुरेसे नाही. बिबट प्रजनन नियंत्रण करण्याची गरज आहे अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी सातत्याने उपस्थित केली आहे. या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे यांनी आज केंद्रीय वने व पर्यावरणमंत्री भुपेंद्र यादव व वन विभागाचे महासंचालक गोयल यांची भेट घेतली.

या भेटीत खासदार डॉ. कोल्हे यांनी बिबट प्रजनन नियंत्रण करावे या मागणीबरोबरच बिबट प्रवण क्षेत्रात दिवसा थ्री फेज वीज पुरवठा करण्याची आणि बिबट-मानव संघर्षाबाबत अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री यादव आणि महासंचालक गोयल यांनी तातडीने बैठक बोलावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

डॉ. अमोल कोल्हे, खासदार - शिरूर लोकसभा मतदारसंघ

बिबट्यांच्या हल्ल्याइतकाच घोणस व इतर विषारी सर्पदंशाचा विषयही गंभीर झाला असून बिबट्यांच्या हल्ल्याच्या निकषानुसार विषारी सर्प दंशाने मृत्यू झालेल्या अथवा कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याची मागणी या वेळी करण्यात आली.या संदर्भात केंद्रीयमंत्री यादव व महासंचालक गोयल यांनी स्नेक बाईट सेंटर सुरू करता येईल का? किंवा घोणस सर्पदंशाचे प्रमाण कमी करता येईल का? याची चाचपणी करण्याचे निर्देशही दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT