Sarpanch Datta Ganjale
Sarpanch Datta Ganjale sakal
पुणे

Manchar News : बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात चक्क मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे; हटके आंदोलनाची जोरदार चर्चा

डी. के. वळसे पाटील

मंचर - आंबेगाव तालुक्यात अनेक गावात बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन खात्याने लोखंडी पिंजरे लावले आहेत. दररोज आजूबाजूचे लोक, वनखात्याचे कर्मचारी बिबट्या जेरबंद झाला किंवा नाही याची पाहणी करतात. त्याप्रमाणे गुरुवारी (ता. २२) आजूबाजूच्या लोकांनी दूरवरून सुरक्षित अंतर ठेऊन पाहाणी केली. पिंजऱ्यामध्ये एक नागरिक असल्याचे पाहून गावात खळबळ उडाली. उलट सुलट चर्चेला उधाण आलं.

दबकत पिंजऱ्याजवळ आल्यानंतर पिंजऱ्यामध्ये मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे असल्याचे पाहून सर्वांना धक्का बसला. कृषी पंपांना दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी पिंजऱ्यात बसून आंदोलन सुरू असल्याचे गांजाळे यांनी सांगितल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या अभिनव आंदोलनाची चर्चा जोरदारपणे सर्वत्र सुरु आहे.

मंचर (ता. आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दत्ता गांजाळे यांनी दिवसा वीज मिळावी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, जलसंपदा विभागाकडून वाढीव पाणीपट्टी वसूल करू नये, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळावी, बिबट्यांची नसबंदी करावी, पिंजऱ्याची संख्या वाढून प्रत्येक गावात जनजागृतीचे कार्यक्रम वनखात्याने आयोजित करावेत, वीज बिल माफी मिळावी, मोजणीची कामे व तहसील कार्यालयातील कामे जलद गतीने व्हावीत आदी मागण्यांच्या पाठपुरव्यासाठी उपोषणाला बसले आहेत.

गुरुवार हा उपोषणाचा पाचवा दिवस होता. प्रशासनातील अधिकारी आंदोलन ठिकाणी फिरकले नाहीत. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसली चर्चा केली नाही. त्यामुळे गांजाळे गुरुवारी काही वेळ उपोषणाच्या सभा मंडपातून गायब झाले होते. प्रशासनाने त्यांचा शोध घेतला असता ते चांडोली (ता.आंबेगाव) येथे वनखात्याने बिबट्यांना पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातच त्यांनी उपोषण सुरू केले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगली धावपळ झाली.

तहसीलदार संजय नागटिळक, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी दत्ता कोकणे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर, विकास जाधव, अरुण बाणखेले, रंगनाथ थोरात ,दत्तात्रय खानदेशे आदी मान्यवरांनी पिंजऱ्या जवळ जाऊन गांजाळे यांची मन धरणी केली. सदर प्रश्नाच्या पाठपुरावासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी तूर्ता आंदोलन स्थगित केले आहे.

'बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांची नसबंदी व्हावी, याबाबतचा प्रस्ताव नागपूर येथील वन विभागाच्या मुख्यालयात पाठवण्यात आला आहे. परवानगी आल्यानंतर कारवाई केली जाईल. गावोगावी बिबट्यापासून सतर्क राहण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. बिबट्यामुळे कुठली समस्या निर्माण झाल्यास ताबडतोब १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.'

- स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर तालुका आंबेगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT