आंधळगाव, ता. ७ : पिंपळसुटी (ता. शिरूर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर शुक्रवारी (ता. ७) सकाळी वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.
पिंपळसुटी परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता. काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर वनविभागाने परिसरात पिंजरे व ट्रॅप कॅमेरे लावून बिबट्याचा शोध सुरू केला होता. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पिंजऱ्यांची तपासणी करण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीमच्या सदस्यांना ताराचंद पारखे यांच्या शेतातील पिंजऱ्यात बिबट्या अडकलेला आढळून आला. मनोज चौधरी, अमोल पाटोळे, गोविंद शेलार व संदीप गव्हाणे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ वनविभागाच्या पथकाला माहिती दिली. त्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे रेस्क्यू करण्यात आले. पकडलेला बिबट्या नर जातीचा असून, त्याचे वय अंदाजे दोन वर्षे असल्याची माहिती वनविभागाने दिली. पुढील कार्यवाहीसाठी त्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात सोडण्यात येणार आहे. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनपरीक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर शितोळे, शरद गदादे, सुनील कळसकर, रोहिदास शेंडगे, राहुल अवचिते, शरीफ शेख आदींनी विशेष सहकार्य केले.
पिंपळसुटी परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी सध्या १५ पिंजरे सक्रिय ठेवण्यात आले आहेत. परिसरातील इतर बिबट्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाची मोहीम सुरूच राहणार आहे.
- नीलकंठ गव्हाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.