Leopard
Leopard Sakal
पुणे

विहिरीत पडलेल्या बिबट्याचा मृत्यू; रेस्क्यू टिमच्या प्रयत्नांना अपयश

सकाळ वृत्तसेवा

वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. विहिरीत पडलेल्या या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला अपयश आले.

- दत्तात्रय कदम

मांडवगण फराटा - वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. विहिरीत पडलेल्या या बिबट्याला वाचविण्यात रेस्क्यू टीमला अपयश आले. जास्त वेळ पाण्यात राहिल्याने बिबट्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडगाव रासाई (ता.शिरूर) येथील शेतकरी बाळासाहेब जाधव हे नेहमीप्रमाणे शेतातील विद्युत पंप चालू करण्यासाठी विहिरीवर मंगळवारी सकाळी गेले होते. या वेळी त्यांना विहिरीत आवाज येत असल्याचे ऐकू आले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसून आले. हा बिबट्या विहिरीत असलेल्या लाकडाच्या ओंडक्याच्या आधारावर तरंगत होता. याबाबतची माहिती त्यांनी सरपंच सचिन शेलार यांना दिली.

बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती कळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनीही विहिरीतील बिबट्या पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी शिरूर येथील रेसक्यू टीमला पाचारण करण्यात आले होते. रेस्क्यू ऑपरेशनवेळी बिबट्याला बाहेर काढत असताना जास्त काळ बिबट्या पाण्यात असल्यामुळे थकवा आल्याने त्याचा मृत्यू झाला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृत बिबट्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीबाहेर काढले. बिबटयाचा मृत्यू झाल्याने स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत हळहळ व्यक्त केली.

या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रवीण क्षीरसागर, वनरक्षक भुटेकर, वन कर्मचारी नवनाथ गांधले, सुधीर शितोळे, गोविंद शेलार, मनोज चौधरी, शरीफ शेख, अभिजीत सातपुते आदी कर्मचाऱ्यांनी रेसक्यू ऑपरेशन मध्ये सहभाग घेतला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT