Leopard Life Saving Sakal
पुणे

Leopard : वडाच्या झाडावर केबलचा फास लागून अडकलेल्या बिबट्यास जीवदान

वडाच्या झाडावर छेद असलेल्या केबल मध्ये फास लागून अडकलेल्या बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध करून झाडावरून खाली घेतले.

अर्जुन शिंदे

वडाच्या झाडावर छेद असलेल्या केबल मध्ये फास लागून अडकलेल्या बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध करून झाडावरून खाली घेतले.

बेल्हे - गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे आज (ता. ४) पहाटेच्या सुमारास वडाच्या झाडावर छेद असलेल्या केबल मध्ये फास लागून अडकलेल्या बिबट्यास वन कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध करून झाडावरून खाली घेतले. दरम्यान या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, गुळुंचवाडी ( बेल्हे) येथे आज (ता. ४) पहाटेच्या सुमारास एका शेतातील वडाच्या झाडावर छेद असलेल्या केबल मध्ये फास लागून, बिबट्या अडकला असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. याबाबत जुन्नर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल भांबेरे यांनी वनविभागाला कल्पना दिली.

त्यानंतर जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे, ओतूर चे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल श्रीमती ढोबळे, माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावणे, महेंद्र ढोरे आदीसह रेसक्यु टीम घटनस्थळी दाखल झाली. यावेळी बिबट्याला रेस्क्यु टीमच्या मदतीने बेशुद्ध करून, झाडावरून खाली घेण्यात आले. दरम्यान झाडावर चढताना केबलचा बिबट्याच्या कमरेला फास लागला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले. दरम्यान बिबट्याला पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाहनधारकांसाठी गूडन्यूज! PUC टेस्ट ३ वर्षातून एकदाच, सरकारचा प्रस्ताव

Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

Gokul Election Politics : देवाभाऊंना बोला... मुश्रीफांना घ्या... गोकुळ बिनविरोध करा; राजेश पाटील यांचा शिवाजी पाटील यांना सल्ला, महाराजस्व कार्यक्रमात जुगलबंदी

Latest Live Updates Marathi : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थी आंदोलनातील हिंसाचाराची SIT चौकशी

'एक अधिकारी, एक कार', सरकारी ताफ्यावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; गैरवापर आणि खर्च कमी होणार

SCROLL FOR NEXT