manjari.jpg 
पुणे

मांजरीत बिबट्याचा वावर; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन

सकाळन्यूजनेटवर्क

वाघोली - मांजरी खुर्द, आव्हाळवाडी व कोलवडी  परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत असल्याने या गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली वावरत आहे. ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पुणे वन विभागाने केले आहे. मंगळवारी रात्री तर बिबट्याचे दर्शनच झाले.

One Plus 8 - जबरदस्त डिस्प्लेसह आकर्षक फीचर्स

मांजरी खुर्द परीसर, कोलवडी भालसिंग वस्ती, शितोळे वस्ती परीसरात बिबट्याचा वावर अनेक दिवसांपासून आहे.या परिसरात अनेक प्राण्यांवर त्याने हल्ला केला आहे. मांजरी खुर्द परिसरात पिंजरही लावण्यात आला होता. मात्र त्याने गुंगारा दिला. मांजरी खुर्द मधील माहेर संस्था रोड (पवार वस्ती मार्ग) परीसरात कुटे यांच्या म्हशीच्या गोठया जवळ मंगळवारी रात्री काही ग्रामस्थ शेतात चारचाकी वाहनाने विहिरीवर पाण्याची मोटार बंद करण्यासाठी जाताना ग्रामस्थांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले.त्यांनी त्याचा व्हिडिओही घेतला. कोरोनाच्या या संकट काळात नागरिकांना बिबट्याचीही भीती आहे. या परिसरात पिंजरा लावून त्याला पकडावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuvraj Singh : तू आणखी ३ ते ६ महिने जगू शकतोस... युवराज सिंगला डॉक्टरांनी सांगितले; माजी खेळाडू म्हणाला, मेलो तरी चालेल, पण...

Post Office Scheme: 300 रुपयांची बचत 15 लाखांचा फंड! व्याजतूनच मिळतील तब्बल 4.40 लाख; पोस्ट ऑफिस योजनेचा जबरदस्त फायदा

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर–जालना महामार्गावरील पेट्रोल पंपावर महिलेचा खून; घटना सीसीटीव्हीत कैद, प्रियकरावर संशय

Sharad Pawar: बारामतीत विडी कामगाराला उभं केलं, पण आमदार झाले विजयराव मोरे! पवारांचा राजकीय डाव फसवणारे मोरे घराणे

Taj Mahal Treasure Discovery : समुद्रात गाडला गेलेला ताजमहलचा खजिना! ३०० वर्षानंतर सापडलाय; उलगडलं मुघलकालीन रहस्य, पाहा

SCROLL FOR NEXT