leopard
leopard 
पुणे

मंगरूळ येथे शेतात आढळला बिबट्याचा बछडा

अर्जुन शिंदे

आळेफाटा - मंगरूळ (ता. जुन्नर) येथे श्रीरामनगर परिसरात आज (बुधवार) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, एक महिला वांग्याच्या शेतात पाणी देत असताना बिबट्याचा बछडा समोर दिसला. बिबट्याचा बछडा जोरात गुरकाविल्याने संबंधित महिला घाबरून ओरडतच तेथून पळाली.

दरम्यान हा बिबट्याचा बछडा आजारी असल्याचे निदर्शनास आल्याने वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या बछड्यास गोधडीच्या सहाय्याने अलगद पकडून पिंजऱ्यात बंदिस्त करून, पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवले.

मंगरूळ येथे श्रीरामनगर परिसरात सावळेराम गंगाराम लामखडे यांच्या वांग्याच्या पिकाच्या शेतात सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास  अंजाबाई बाबाजी लामखडे या वांग्याच्या शेताला पाणी देत असताना त्यांना अचानक बिबट्याचा बछडा समोर दिसला. यावेळी बिबट्याचा बछडा जोरात गुरकल्याने त्या घाबरून ओरडतच तेथून पळाल्या. यावेळी सुमारे ५ महिने वयाचा नर जातीचा हा बिबट्याचा बछडा वांग्याच्या शेतात तसाच बसलेला होता. दरम्यान पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी तातडीने याबाबत वनविभागाला कळविले. वनरक्षक डी. डी. फापाळे, वनकर्मचारी जे. टी. भंडलकर, के. एस. नायकोडी, आनंदा गुंजाळ यांनी याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता, बिबट्याचा बछडा आजारी अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वनरक्षक डी. डी. फापाळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान व माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर बिबट्याच्या बछड्यास गोधडीच्या सहाय्याने अलगद पकडून पिंजऱ्यात बंदिस्त करून, पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी उपसरपंच चंद्रकांत ढगे, सुखदेव लामखडे, दिगंबर खुटाळ, विठ्ठल खिलारी, नवनाथ लामखडे आदी ग्रामस्थांनी वनकर्मचाऱ्यांना सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT