Leopard
Leopard Sakal
पुणे

राजुरी येथील गोगडी मळयात लावलेल्या पिंजऱ्यात अडकला बिबटया

सकाळ वृत्तसेवा

राजुरी (ता. जुन्नर) येथील गोगडी मळयामधील दुर्गामातानगर मध्ये मंगळवार दि. १५ रोजी रात्री अकरा वाजता बिबटया पिज-यात अडकला.

- राजेश कणसे

आळेफाटा - राजुरी (Rajuri) (ता. जुन्नर) येथील गोगडी मळयामधील दुर्गामातानगर मध्ये मंगळवार दि. १५ रोजी रात्री अकरा वाजता बिबटया (Leopard) पिंजऱ्यात (Cage) अडकला.

याबाबत सविस्तर माहीती अशी की राजुरी येथील गोगडी मळयामधील उमेश शंकर नायकवडी यांच्या शेतात दि. १२ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घराच्या बाजुला असलेल्या शेतावर त्यांणा एक बिबटया मृतावस्थेत आढळला होता. त्यामुळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी या ठिकाणी अजुन दुसरा बिबटया असल्याने या ठिकाणी पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती त्यानुसार पिंजरा लावण्यात आल्यानंतर मंगळवार रात्री नर जातीचा बिबटया या पिंजऱ्यात अडकला असुन यास माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्रात सोडण्यात आले आहे.

दरम्यान राजुरी गावात गेल्या आठ दिवसात दोन कालवडी व एक शेळीवर बिबटयाने हल्ला करून ठार केले होते.या गावात बिबटयाचे प्रमाण जास्त असल्याने वनविभागाने पिंज-यांचे प्रमाण वाढवावे अशी मागणी राजुरी गावच्या सरपंच प्रिया हाडवळे व उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके यांणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT