4Leopard_1_17.jpg
4Leopard_1_17.jpg 
पुणे

तीन दुचाकीचा पाठलाग करुन बिबट्याने केला हल्लाचा प्रयत्न

पराग जगताप

डिंगोरे (जुन्नर) : येथे रविवारी सायंकाळ दरम्यान डिंगोरे ते मराडवाडी मार्गावर आमलेशिवारातील गजानन महाराज मंदिरा जवळ उसात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीचा पाठलाग करुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने तीनही दुचाकीस्वारांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. मात्र बिबट्या करत असलेल्या पाठलागामुळे वाड्या वस्त्यांवर येजा करणाऱ्या नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी सायंकाळी साडेसहा दरम्यान रवि लोहोटे हे डिंगोरे मराडवाडी मार्गाने घरीजात असताना आमलेशिवार परिसरात गजानन महाराज मंदिर जवळ उसात दबाधरुन बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकिचा पाठलाग केला. बिबट्या पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच रवि लोहटे मोठ्याने ओरडले व गाडी वेगात पळवली व घरी पोहचले. त्यानंतर सदर घटनेची त्यांनी मित्रांना व वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सव्वा सात वाजे दरम्यान उमेश उकिर्डे हे त्याच मार्गाने  घरी जात असताना बिबट्याने त्यांच्याही दुचाकिचा पाठलाग केला. त्यांनीही गाडीचा वेगवाढवुन गाडी पुढे नेली.  बबन आमले यांच्या घरापाशी थांबवुन गाडी मागे वळवुन बिबट्या गाडीच्या प्रकाशात दिसतोय का हे पहात होते. त्याच वेळी मागून दुचाकिवर येत असलेले उल्हास आमले यांच्या दुचाकिचा बिबट्याने पाठलाग केला. त्यांच्या दुचाकीवर झेप घेवुन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही असफल ठरला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. सदर घटनेची ओतूर वनविभागाला ही माहिती देण्यात आली,वनविभागाचे कर्मचार्यानी सदर ठिकाणी रस्त्यावर व  परिसरात गस्त घातली.

जुन्नर तालुक्यातील ओतूर, डिंगोरे, उदापूर, नेतवड, सारणी, अहिनवेवाडी, मांदारणे, पिंपळगाव जोगा व इतर परिसरातील बिबट प्रवणगावात बिबट्याचे दर्शन होणे हि नित्याची बाब आहे. मात्र काहीकाळा पासून बिबट्याचे दुचाकीवर होणारे हल्ले ही जुन्नर तालुक्यातील जनतेसाठी चिंतेची बाब ठरु लागली आहे. त्यामुळे मानव व बिबट्या संघर्ष वाढु लागला आहे. याबाबत जनजागृती व बिबट प्रवणक्षेत्रात वावरताना आवश्य मार्गदर्शक सुचनाचे पालन होणे गरजेचे असुन वनविभागानेही याबाबत जनजागृती अभियान परत राबवने गरजेचे आहे. तरी डिंगोरे व परिसरात वनविभागाने मोका पहाणी करुन बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा तसेच सायंकाळी बिबट्याचे दुचाकीवर हल्ले होणाऱ्या सर्वच मार्गावर गस्त घालावी अशी मागणी नागरिकांकडुन होत आहे.

डिंगोरे मराडवाडी यामार्गावरुन व इतर वाड्या वस्त्यावरुन डिंगोरे गावठाणात शाळेला येणाऱ्यां मुलांची संख्या शंभरच्या अासपास असल्याने रविवारच्या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन रस्त्याने येतानाजाताना घ्यावयाची खबरदारीची माहीती दिली. तसेच गटागटाने एकत्र यावे व बरोबर मोठे आवाज करणारे यंत्र बाळगावे किंवा मोठा आवाज करावा याबाबत माहिती दिली.  तशा शाळेकडुनही सुचना देण्यात आल्या. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिंगोरेतील ज्या विद्यार्थ्याना घरी नेणयासाठी पालक आले नाही त्या विद्यार्थ्याना याच शाळेचे शिक्षक राजेंद्र गारे यांनी स्वतः घरी पोहचवले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT