पुणे

विजेचा कहर

CD

तीन ठिकाणी वीज पडून
महिलेसह २३ जनावरांचा मृत्यू

तुमसर तालुक्यात पावसासह विजेचा कहर

ॲग्रोवन वृत्तसेवा
भंडारा : तुमसर तालुक्यात सोमवारी (ता. २२) दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या पावसादरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून एका महिलेसह २३ जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी व पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
तालुक्यातील लोहारा शिवारात शेतीकाम करत असताना भीमलता भोजराम उचिबगले (वय ५०) यांच्यावर वीज कोसळली. गंभीर जखमी झालेल्या उचिबगले यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, देवनारा शिवारात वीज कोसळून तब्बल २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये गौराबाई धनराज कोसरे यांच्या २, भारत भिका पेंदाम यांच्या १४, ताराचंद श्रावण सलाम यांच्या ३, कन्हैया सुदाम मरसकोल्हे यांच्या २ आणि देवीचंद सीताराम मेश्राम यांच्या १ शेळीचा समावेश आहे. एका क्षणात झालेल्या या दुर्घटनेमुळे संबंधित पशुपालकांवर आर्थिक संकट कोसळले आहे.
तसेच सुकळी येथे वीज पडल्याने रूपेश मारुती चौधरी यांची एक म्हैस दगावली. अशा प्रकारे तालुक्यातील तीन ठिकाणी झालेल्या वज्राघाताच्या घटनांमध्ये एका महिलेसह एकूण २३ जनावरांचा बळी गेला. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामे केले आहेत. स्थानिक तलाठ्यांनी नुकसानीचा अहवाल तयार करून तहसीलदार, तुमसर यांच्याकडे सादर केला असून, बाधितांना शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

CM Devendra Fadnavis: उद्योगांत महाराष्ट्र अव्वलच, 'कंपन्या बंद'चा दावा चुकीचा; फडणवीस यांचा विश्वास

आज शूटिंगचा शेवटचा दिवस... झी मराठीची मालिका अवघ्या ७ महिन्यात घेणार निरोप; मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का

SCROLL FOR NEXT