Dilip Walse Patil sakal
पुणे

Dilip Walse Patil : राज्यातील ग्रामसेवकाप्रमाणे प्राथमिक शिक्षकांनाही पदोन्नतीबाबत निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणार

'ग्रामसेवकांप्रमाणे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही दहा, वीस, तीस आश्वासित प्रगती योजना व नियमित टप्प्यावर पदोन्नतीसाठी प्रयत्न केला जाईल.

डी. के. वळसे पाटील

मंचर - 'ग्रामसेवकांप्रमाणे प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही दहा, वीस, तीस आश्वासित प्रगती योजना व नियमित टप्प्यावर पदोन्नतीसाठी प्रयत्न केला जाईल. उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांसाठी राज्याचे निश्चित धोरण राबविणार आहे.' असे आश्वासन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित एमएड कृती समितीच्या आंबेगाव तालुका कृती समिती संघटनेला दिले.

मंचर (ता. आंबेगाव) येथे रविवारी (ता. १३) वळसे पाटील यांची भेट महाराष्ट्र राज्य उच्चशिक्षित कृती समितीचे संस्थापक राज्य अध्यक्ष राजु जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका उच्च शिक्षित एम.एड कृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली.

सविस्तर चर्चा केली.यावेळी संघटनेचे आंबेगाव तालुका सरचिटणीस अरविंद मोढवे, तालुका कार्याध्यक्ष भगवान टाव्हरे, कोषाध्यक्ष किसन शिंगाडे, राज्य कार्यवाह जनार्धन बोटकर, प्रवक्ते सखाराम मुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी मिलिंद पानसंडे, एस.सी तांबे उपस्थित होते.

'महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षकांमध्ये उच्च प्राथमिक शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, शैक्षणिक गुणवत्ता वाढ व विकास या दृष्टिकोनातून विविध उपक्रमाचे नियोजन आणि शिक्षणाचे सार्वत्रीकिकरण करणे. या दृष्टिकोनातून अनुभवी कार्यात उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना संधी दिली तर शैक्षणिक गुणवत्ता विकास उपक्रम राबवणे बाबत महाराष्ट्र शैक्षणिक दृष्ट्या देशांमध्ये प्रथम क्रमांकाचे शैक्षणिक विकासाबाबत राज्य प्रगत होऊ शकते.

कार्यरत प्राथमिक शिक्षकांमधून नियुक्ती केल्या तर कोणताही आर्थिक अधिभार शासकीय तिजोरीवर येणार नाही. केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी या पदोन्नतीमध्ये उच्च शिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षकांना ५०-५० टक्के पदे देणे, सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करून सातव्या आयोगामध्ये पदवीधर शिक्षकांच्या बाबतीत वेतन त्रुटी, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ, ऑनलाइन कामे तसेच मुख्यालय बाबतही यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.' अशी माहिती राजू जाधव यांनी दिली.

'अनुभवी उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीबाबत योग्य त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सेवाशर्ती अधिनियम १९६७ चे राजपत्र बदलणे बाबतची कार्यवाही करणे विषयीची लवकरच ग्रामविकास विभागाची बैठक आयोजित केली जाईल.'

- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: पाकिस्तानला चौथा धक्का; अक्षर पटेलने बाबर आझमला केलं 'क्लिन बोल्ड'

Pune Crime : कल्याणीनगरमध्ये दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाईल हिसकावला, येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : शिवभक्तांच्या वाहनाचा अपघात; एक ठार, १७ जण जखमी

Pune Crime : महापालिका भवनजवळ दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाचा मोबाईल लंपास

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

SCROLL FOR NEXT