पुणे

उपक्रमांनी पार पडला लपतळवाडीचा उत्सव

CD

सोमेश्‍वरनगर, ता. १९ : लपतळवाडी (ता. पुरंदर) येथे मातृदेवतेचा तीन दिवसीय ‘लिमजाई माता यात्रा उत्सव’ विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे पार पडला. या निमित्ताने भजन, कीर्तन, छबिना, तमाशा, ढोल-ताशा स्पर्धा पार पडल्या.
बहुतांश गावात भैरवनाथ, पीरबाबा यांच्या यात्रा-जत्रा होतात. लपतळवाडी गावात मात्र लिमजाई माता या मातृदेवतेचा यात्रा उत्सव आयोजित करण्याची परंपरा आहे. उत्सवात रविवारी (ता. १५) पांडुरंग महाराज यांची कीर्तनसेवा आणि श्रीनाथ भजनी मंडळ पथकाचे भजन पार पडले. सोमवारी लिमजाई मातेस वाड्यावस्त्यावरील ग्रामस्थांनी पूजा, अभिषेक, दंडवत याद्वारे वंदन केले. सोमवारची संपूर्ण रात्र ग्रामस्थांनी परंपरेप्रमाणे जागून काढली. सुरवातीला छाया खिलारे-बाारामतीकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा तमाशा पार पडला. यानंतर दोन ते सहा या वेळेत पुणे व सातारा जिल्ह्यातून आलेल्या अठरा ढोलताशा मंडळाने आपापले खेळ सादर केले. ग्रामस्थांनी त्याला भरभरून बक्षीसे दिली.
खेळ संपल्यानंतर लिमजाई मातेच्या पालखीची आणि काठीची मिरवणूक गुलालाच्या उधळणीत पार पडली. मंगळवारी बाबूराव कांबरेकर लोकनाट्य पारंपरिक तमाशा पार पडला. यानंतर यात्रा उत्सवातच ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सन्मान सोहळा झाला. यामध्ये पनवेल महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल रामदास शेवाळे यांचा तर पुरंदर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल प्रवीण जगताप यांचा सत्कार करण्यात आला. मांडकी विद्यालयास संगणक प्रणाली दिल्याबद्दल अभियंता राहुल गुरव, ॲड. नवनाथ जगताप यांचा तर गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केल्याबद्दल सोमेश्‍वर शिक्षण मंडळाचे सचिव भारत खोमणे यांना मच्छिंद्र पिलाणे, वसंत पिलाणे, संजय शेरे आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी रवींद्र पिलाणे, काशिनाथ पिलाणे, सचिन शेटे, आत्माराम यादव, विष्णू पिलाणे, नितीन पिलाणे, चतर पिलाणे, देविदास मोरे उपस्थित होते. प्रा. कुंडलिक कदम यांनी प्रास्ताविक केले. महादेव पिलाणे यांनी सूत्रसंचालन तर सतीश बिरामणे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT