पुणे

दारुबंदीचा निर्णय असताना चितळीत परवानगी कशी?

CD

दारूबंदीचा ठराव असतानाही बारला परवानगी

चितळीत निर्णयाचे उल्लंघन; महिलांचे गटविकास अधिकाऱ्यांसह पोलिसांना निवेदन

मायणी, ता. २२ : चितळी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीने २०१७ मध्ये सर्वानुमते मंजूर केलेल्या दारूबंदीच्या ठरावाचे उल्लंघन करून गावात बिअर बारला परवानगी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याविरोधात संतप्त महिलांनी एकत्र येत वडूजचे पोलिस प्रशासन व गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे, तसेच देण्यात आलेला बारचा परवाना त्वरित रद्द करण्याची मागणीही शालन हजारे, राजश्री पवार, अनुसया गायकवाड, राधिका पंडित, सुप्रिया देशमुख यांनी केली आहे.
याबाबत सुप्रिया देशमुख यांनी सांगितले, येरळा नदीच्या काठावरच्या चितळी ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट २०१७ रोजीच्या ग्रामसभेत महिलांनी एकजुटीने दारूबंदीचा ठराव मंजूर करून घेतला होता, तसेच या ठरावात, ‘कोणत्याही दारूच्या व्यवसायासाठी किंवा दुकानासाठी परवाना हवा असेल, तर आधी महिलांची ग्रामसभा बोलावून त्यांची लेखी मान्यता घेतल्याशिवाय कोणताही ठराव मंजूर केला जाणार नाही,’ असे नमूद केले होते. मात्र, असे असताना २६ जानेवारी २०२४ रोजीच्या ठरावाच्या नकलानुसार बिअर बार आणि रूम सुरू करण्यास चोरून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी कोणतीही ग्रामसभा आयोजित करण्यात आली नव्हती आणि आम्हाला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचे देशमुख यांनी सांगितले.
२०१७ च्या ठरावाचे उल्लंघन झाले असून, महिलांनी केलेल्या दारूबंदीच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम व पोलिस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांच्याकडे आज लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
---------------------------
दारू विक्री सुरूच

गावातील महिलांना, मुलींना आणि शाळकरी मुलांना व्यसनाधीनतेमुळे त्रास होत असताना २०१७ चा दारूबंदीचा निर्णय लागू व्हावा. गावात सर्व प्रकारची दारू विक्री सुरू असल्याचा आरोपही महिलांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
--------------------------
03350
वडूज : येथील गटविकास अधिकारी योगेश कदम यांना निवेदन देताना चितळीतील महिला. (अंकुश चव्हाण : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT